आपला जिल्हादेहूरोड कॅन्टोन्मेंट

आमदार सुनिल शेळके यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्षांची घेतली भेट, नागरी समस्या तक्रारी बाबत केली चर्चा.

कोणत्याही बाधा येणार नाही, कॅन्टोन्मेंट बोर्ड या बाबत सकारात्मक, ब्रिगेडियर अमन कटोच.

Spread the love

आमदार सुनिल शेळके यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्षांची घेतली भेट, नागरी समस्या तक्रारी बाबत केली चर्चा.MLA Sunil Shelke met the Chairman of Dehurod Cantonment Board, discussed the civil problem complaints; 

कोणत्याही बाधा येणार नाही, कॅन्टोन्मेंट बोर्ड या बाबत सकारात्मक, ब्रिगेडियर अमन कटोच.There will be no hurdle, Cantonment Board is positive about this, Brigadier Aman Katoch.

आवाज न्यूज : देहूरोड प्रतिनिधी, १४ ऑगष्ट.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर अमन कटोच यांची भेट घेऊन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विकास कामाबाबत चर्चा केली. तसेच स्थानिक शेतकऱ्यांचे समस्यावर चर्चा केली देहरोडच्या कँन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे त्यामुळे सार्वजनिक विकासावर याच्या परिणाम होत आहे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रलंबित असलेल्या कामांना पहिले गती द्यावे सार्वजनिक विकासावर परिणाम होत असल्याने पहिले नागरिकांचे गैरसोय दूर करावे अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी बोर्डाचे अध्यक्ष अमन कटोच यांच्याकडे केली.

तेव्हा अमन कटोच यांनी विकास कामाबाबत कॅन्टोन्मेंट बोर्ड सकारात्मक असून सार्वजनिक विकास कामांना कुठलेही प्रकारचे बाधा येणार नाही आपल्या सर्व मागणीकडे तसेच प्रलंबित मागणी कडे लक्ष देत सर्व कामे करण्यात येथील असे आश्वासन दिले यावेळी देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमित कुमार माने, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त नंदकुमार पिंजण, अतुल मराठे, देहूरोड राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण झेंडे आदी उपस्थित होते.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा बैठक संपल्या नंतर आमदार सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयास भेट दिली अनेक नागरिकांचे समस्या बाबत अध्यक्ष प्रवीण झेंडे यांच्याशी चर्चा केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलचे देहूरोड शहर अध्यक्ष दिनानाथ चौरसिया यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

तसेच यावेळी राष्ट्रवादीचे धडाडीचे नेते तरलोकचंद रत्तू यांनी आमदार सुनील शेळके यांची पक्ष कार्यालयात भेट घेऊन देहूरोड मध्ये खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना मैदान उपलब्ध नसल्याने खेळ खेळणाऱ्या खेळाडुंना सराव करण्यात अडचणी निर्माण होत आहे तरी खेळाडूंनसाठी सराव मैदान उपलब्ध करून द्यावा यासाठी त्यांनी आमदार सुनील शेळके यांना यावेळी निवेदन दिले. या वेळी नागरिकांनी आपल्या समस्या आमदारांसमोर मांडल्या या कार्यालयीन बैठकीत दिपक चौगुले हिरामण साळुंखे अल्ताफ शेख, अध्यक्ष प्रविण झेंडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!