शंकर दादा स्पोर्ट्स वतीने स्पर्धा सम्पन्न.
शिराळा प्रतिनिधी
शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स यांचे तर्फे रामलीला मैदान नेरूळ येथे आयोजित शंकर दादा मोहिते चषक 2022 चां मानकरी आरसीसी कुंभवडे संघ ठरला तर उपविजेता बिळाशी वारियार बीळाशी या संघास समाधान मानावे लागले.तिसऱ्या क्रमांकावर संजय दादा स्पोर्ट्स करुंगली तर चौथ्या स्थानी वाकाईदेवी स्पोर्ट्स वकाईवाडी यांनी पटकावला.
प्रथम विजेत्यांना 31,000/- व चषक
द्वितीय विजेत्यांना 21,000/- व चषक
तृतीय विजेत्यांना 11,000/- व चषक
चतुर्थ विजेत्यांना 7,000/- व चषक देवून गौरविण्यात आले
तसेच मालिकावीर म्हणून बिलाशीचा मयूर पन्हालकर तर उत्कृष्ट फलंदाज वाकाई बाडीचा महेश डफळे उत्कृष्ट गोलंदाज कुंभवडेचा नरेश कुंभवड उत्कृष्ट क्षेत्र रक्षक करूगळीच्या सुहास चव्हाण यांना गौरवण्यात आले.
या स्पर्धेसाठी शिराळा पंचायत समितीचे सभापती सम्राट भैय्या नाईक, प्रमोद दादा साळुंखे, विवेक तात्या नाईक, प्रकाश मामा पाटील,वसंत भादुगाले सेठ तसेच 32 शिराळा क्रिकेट असोिएशन चे सर्व पदाधिकारी / सम्राट नाईक युवा शक्ती चे सर्व सदस्य/ तसेच तालुक्यातील मुंबई स्थित सर्व पक्षीय मान्यवर उस्थित होते.
या स्पर्धेचे नियोजन शंकर दादा मोहिते यांच्या मार्गदर्शनातून विजय जाधव व प्रकाश भाषटे यांनी केले होते.