ताज्या घडामोडी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 12 वा वर्धापन दिन चांदोली येथे साजरा.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 12 वा वर्धापनदिन चांदोली येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचे प्रकल्प संचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, सहायक वनसंरक्षक बागडत, तुषार ढमढेरे, वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे , ज्ञानेश्वर राक्षे, संदीप जोपाळे, बाळकृष्ण हसबनीस, संदीप कुंभार , पापा पाटील, सुनील करकरे,सुधीर कुंभार, नाना खामकर,गिरीश पंजाबी, प्रदीप सुतार,मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, अजितकुमार पाटील, निलेश बापट, राज्य वन्यजीव मंडळ सदस्य सुहास व्यंगणकर, राज्य जैवविविधता मंडळचे श्याम बजेकल, मिलिंद पंडितराव व इतर स्थानिक व वनकर्मचारी उपस्थित होते.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापणा समोरील आव्हाने ह्या विषयी उपसंचालक उत्तम सावंत यांनी सादरीकरण केले, तर मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी संरक्षण व अपराध विषयी अपेक्षित धोरण ह्या विषयी मार्गदर्शन केले.
भारतीय वन्यजीव संस्था ढेराडूनचे तज्ज्ञ शहानवाज जेलील यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील टायगर रिकव्हरी प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली,वाईल्ड लाईफ कोणझर्व्हेशन ट्रस्टचे तज्ञ गिरीश पंजाबी यांनी सह्याद्री व्याघ्रप्रकल्प व वन्यप्राणी यांचे भ्रमण मार्ग ह्याविषयी मार्गदर्शन केले.ह्या वेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हिरे ह्या 2022 च्या दिनदर्शिका चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!