पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड चे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा, राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार संपन्न..

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या माध्यमातून चौबे साहेब यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.

Spread the love

पिंपरी-चिंचवड चे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा, राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार संपन्न..Police Commissioner of Pimpri-Chinchwad Vinay Kumar Choubey was felicitated for announcing the President’s Police Medal.

आवाज न्यूज : पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, २१ ऑगष्ट.

पिंपरी – चिंचवडने दिलेले प्रेम आणि आपुलकी मी आयुष्यभर विसरणार नाही. मुंबईत राहत असताना मला दोनदा पदक देऊ करण्यात आले. मात्र पदक पिंपरी-चिंचवड शहरात आल्यानंतर जाहीर करण्यात आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर माझे भाग्यवान आहे, असे प्रतिपादन पिंपरी- चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. त्याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयुक्त चौबे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे यांनीही आयुक्तांचे अभिनंदन केले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, विवेक खरवडकर, सहपोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आडे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी, निगडी पोलिस ठाणे व पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या निमंत्रणावरून या कार्यक्रमास EPS -95 राष्ट्रीय संघर्ष समिती पिंपरी-चिंचवड शहर संघटनेतील पदाधिकारी व पेन्शनर्स उपस्थित होते.

अभिनंदनास  उत्तर देताना पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, या सन्मानाबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघाचे मनःपूर्वक आभार. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मला राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.पिंपरी-चिंचवडने दिलेले प्रेम आणि आपुलकी मी आयुष्यभर विसरणार नाही, त्यानंतर सर्व स्तरातील सर्वांनी माझे मनापासून स्वागत केले. पिंपरी-चिंचवडने दिलेले प्रेम आणि आपुलकी मी आयुष्यभर विसरणार नाही. पहिल्या पोलीस आयुक्तांपासून ते माझ्यापर्यंत सर्वांनीच पिंपरी-चिंचवड शहराचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस आणि जनता वेगळी नाही. नागरिक आपले डोळे आणि कान असले पाहिजेत. नागरिकांनी दोन पावले पुढे टाकले तर चार पावले पुढे टाकून शहरातून गुन्हेगारी दूर करू.रोहित आठवले यांनी प्रास्ताविक केले व आभार अमोल येलमेर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!