आरोग्य व शिक्षण

पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ . धनंजय भिसे यांचा सत्कार

Spread the love

पिंपरी : महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून विद्यावाचस्पती ( पीएच.डी) पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ . धनंजय भिसे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मसाप पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष विनीता ऐनापुरे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ, कार्यवाह संजय जगताप, श्रीकांत जोशी व इतर सदस्य उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना भिसे म्हणाले, 115 वर्षाची परंपरा असलेली, तसेच मराठी भाषेची मातृसंस्था असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद ही एकमेव संस्था आहे. या संस्थेतर्फे होणारा हा सत्कार माझासाठी, सर्व सत्कारापेक्षा खूप मोलाचा आहे इतकेच नव्हे तर मी साहित्य परिषदेचा सभासद आहे याचा मला सार्थ आभिमान आहे. या सन्मानाला माझा व्यक्तिगत जीवनात फार मोठे स्थान निर्माण झाले आहे.

विनीता ऐनापुरे यांनी आभार मानले तर संजय जगताप यांनी सूत्र संचालन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!