अध्यात्मिकमहाराष्ट्रसामाजिक

मानाचे गणपती बरोबरच इतर मंडळाना देखील पोलिसांनी चांगली वागणूक दिली पाहिजे.अजित पवार. उपमुख्यमंत्री

पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची चर्चा..

Spread the love

मानाच्या गणपती मंडळा बरोबरच इतर मंडळाना देखील पोलिसांनी चांगली वागणूक दिली पाहिजे.अजित पवार ; पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची चर्चा..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २९ ऑगष्ट.

पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी गणेश मंडळांच्या अडचणी जाणून घेतल्या. डीजे परवानगी, मंडप परवाना, वाहतूक कोंडी या सगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीनंतर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, बैठक चांगल्या पद्धतीने पार पडली. गणेशभक्तांची सर्वोतोपरी काळजी घेतली जाईल. गणेशोत्सव काळात मेट्रो सकाळी ६ वाजता सुरू होऊन रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

कोणाच्याही मनात दुरावा निर्माण होऊ नये. सर्व सूचना आम्ही दिल्याआहेत. सर्वांनी या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला जाईल.मानाच्या गणपती मंडळा बरोबरच इतर मंडळाना देखील पोलिसांनी चांगली वागणूक दिली पाहिजे, अशाही सूचना अजित पवारांनी दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, मनात वाटले होती की काही वाद निर्माण होईल, पण तसे काही झाले नाही.  खेळी मेळीच्या वातावरणात  बैठक पार पडली. सगळी नियमावली तुम्ही आपापसात एकत्र ठरवायला हवी. निर्णय रेटणं बरोबर नाही, त्यात वाद वाढू शकतो.

पोलीस प्रशासन नक्कीच मदत करेल. कंट्रोल टॉवर सुरू करावे लागतील. पोलीस आणि महापालिका यांनी एकत्र येत निर्णय घ्यावे. गणपती विसर्जन मार्ग सोशल मीडियावर आधीच जाहीर करावी, असंही चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!