ताज्या घडामोडी

एक दिवस वारणा विज्ञान केंद्रामध्ये’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरेल : आमदार विनय कोरे

Spread the love

कोल्हापूर : (वर्षाराणी दुर्गे सरूडकर)
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलचे कुतूहल निर्माण व्हावे, विज्ञानातील संकल्पना सहज करता याव्यात, कृतिशील प्रयोगातून कल्पकता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचालित वारणा विज्ञान केंद्रामार्फत ‘एक दिवस वारणा विज्ञान केंद्रामध्ये’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमात वारणेच्या खर्चातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून विज्ञान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी बस आणि खानपानाची व्यवस्था वारणा संकुलामार्फत करण्यात आली आहे.
इ. ५ वी ते १० वी तील विद्यार्थी मनोरंजनातून वैज्ञानिक समजून घेण्यासाठी, नाविन्यपूर्ण प्रयोगातून विज्ञानाचे धडे गिरवण्यासाठी फन सायन्स लॅब, इनोव्हेशन लॅब आणि मल्टीपर्पज हॉल या अद्यावत सुविधांचा लाभ घेत आहेत. तसेच मुंबई, बेंगलोर नंतर वारणेत उभारण्यात आलेल्या जागतिक दर्जाच्या तारांगणामध्ये ग्रह, तारे, आकाशगंगा, तारकासमूह, राशी-नक्षत्र इत्यादींची शास्त्रीय माहिती चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवली जाते. वारणा बाल वाद्यवृंदातील कलाकारांच्या संगीत सादरीकरणानंतर एकूण दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होते.
शाहूवाडी तालुक्यातील दररोज एका शाळेतील एका वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच दिशादर्शक ठरेल असे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले.
विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी दि न्युज इंग्लिश स्कूल, सुपात्रे ता. शाहुवाडी येथे गोकुळ दूध संघाचे संचालक मा. कर्णसिंह गायकवाड (सरकार) यांच्या शुभहस्ते सुरुवात करण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये असलेल्या सर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना विज्ञान केंद्रांमध्ये आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रिन्सिपल कॉर्डिनेटर डॉ. जॉन डिसोझा यांनी नमूद केले.
या उपक्रमाच्या नियोजनासाठी संतोष जंगम, राजेंद्र पाटील, प्रा. नामदेव चोपडे, विजय फाटक, सायंटिफिक ऑफिसर प्रितेश लोले, ऐश्वर्या मिठारी, किमया पोवार यांच्यासह विज्ञानदूत, विद्या सेवक विशेष प्रयत्न करत आहेत. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी महादेवराव पाटील, संजय वास्कर सर, आबासो पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!