आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

जागतिक संस्कृत दिन सोहळा..

विश्वसंस्कृतदिवसोत्सव "मातृभूमि : भारतम, मातृभाषा संस्कृतम"..

Spread the love

जागतिक संस्कृत दिन सोहळा World Sanskrit Day Celebration

विश्वसंस्कृतदिवसोत्सव “मातृभूमि : भारतम, मातृभाषा संस्कृतम”

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, ३१ ऑगष्ट.

लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेचे संस्थापक स्वामी कुवलयानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून संस्थेच्या गोर्धनदास सेक्सरिया योग एवं सांस्कृतिक समन्वय महाविद्यालयात बुधवार दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी विश्वसंस्कृतदिवसोत्सव:/ World Sanskrit Day Celebration मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या विश्वसंस्कृतदिवसोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. प्राध्यापक देवनाथ त्रिपाठी विभाग प्रमुख, संस्कृत आणि प्राकृत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच डॉ. प्रसाद भिडे, सहायक प्राध्यापक, के.जे. सोमय्या आर्ट्स आणि कॉमर्स, सोमय्या विद्यापीठ, विद्याविहार, मुंबई, कैवल्यधाम योग महाविद्यालयाच्या प्राचार्या, डॉ. बंदिता सतपते, प्राध्यापक डॉ. रणजीत सिंग भोगल, प्राध्यापक श्री आर. के. बोधे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करू करण्यात आले. या प्रसंगी योग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “स्वागत गीत” आणि कैवल्य विद्या निकेतन शाळेतील विद्यार्थांनी “वंदे मातरम” देशभक्तीपर गीत सादर केले.

प्राचार्या डॉ.बंदिता सतपते यांनी प्रमुख पाहुण्यांचा संक्षिप्त परिचय करून दिला आणि त्यांचे शाल, श्रीफळ आणि स्वामी कुवलयानंद यांचे आत्मचरित्र, योग कोश ही पुस्तके देऊन स्वागत केले.

डॉ. प्राध्यापक देवनाथ त्रिपाठी यांनी आपल्या व्याख्यानामधून विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे महत्व पटवून दिले.विध्यार्थांनी भगवद्गीता ( १२ वा अध्याय ) पठण, सूत्र जप, संस्कृत नाटक कत्थक नृत्य, योग प्रात्यक्षिके यांचे आयोजन केले होते.डॉ. प्रसाद भिडे आणि त्यांच्या संघाने प्रतिमानाटकम ( Pratima Drama) सादरीकरण केले.

 

या उत्सवात गोर्धनदास सेक्सारिया योग महाविद्यालयातील योग प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, कैवल्य विद्या निकेतन शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग आणि संस्थेचा अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगत बब्बर आणि कुमारी आदिश्री या विद्यार्थ्यांनी संस्कृत मधून केले. निखील बाक्रे यांनी आभार प्रदर्शन केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!