आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमावळ

लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स च्या संस्थापक अध्यक्षपदी लायन सुरेश गायकवाड यांची नियुक्ती..

Spread the love

लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स च्या संस्थापक अध्यक्षपदी लायन सुरेश गायकवाड यांची नियुक्ती..Lion Suresh Gaikwad has been appointed as the Founder President of Lions Club of Lonavla Legends.

आवाज न्यूज : श्रावणी कामत, लोणावळा प्रतिनिधी, २                         सप्टेंबर.

शुक्रवार दि १ सप्टेंबर रोजी हॉटेल चंद्रलोक येथे झालेल्या समारंभात लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स च्या संस्थापक अध्यक्षपदी लायन सुरेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.ढोल ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करून,लायन्स क्लब चे प्रांतपाल मा लायन विजय भंडारी यांच्या शुभहस्ते लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स या नूतन क्लब ची स्थापना करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी प्रांतपाल लायन डॉ दीपक भाई शहा यांनी नूतन सदस्यांना शपथ प्रदान केली.
यावेळी त्यांनी नवीन क्लब च्या माध्यमातून किमान ५ नवे कायमस्वरूपी प्रकल्प सुरू करण्याचे आवाहन केले.

यावेळी नव्याने स्थापना झालेल्या लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स च्या नूतन कार्यकारिणी ला माजी प्रांतपाल लायन द्वारका जी जालान यांनी शपथ प्रदान करून सर्व कार्यकारिणीला त्यांच्या जबाबदारी संदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी लायन्स संघटना व सामाजिक कार्य या विषयी आपल्या ओघवत्या वाणीने सर्वांसमोर आपले विचार मांडले.यावेळी ज्येष्ठ लायन राजेश मेहता यांनी लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेन्ड्स च्या स्थापने संदर्भात माहिती दिली.

नवनिर्वाचित अध्यक्ष लायन सुरेश गायकवाड यांनी पदभार स्वीकारला व त्यावेळी त्यांनी क्लब च्या सदस्यांचे व सर्वांचे आभार मानले व आपल्या भावी कार्याबद्दल माहिती दिली.यावेळी त्यांनी काही कायमस्वरूपी प्रकल्प जाहीर केले. त्यामध्ये गरजू मुलींना सायकल वाटप, तसेच लोणावळा येथून निगडी व खोपोली येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस स्थानक, लायन्स डेंटल केअर सेंटर याचे मान्यवरांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमात “Legend of Lonavala” या पुरस्काराचे मानकरी भरत अगरवाल नागरी पत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती लता भरत अगरवाल व श्रद्धा हॉस्पिटल लोणावळा चे संचालक डॉ शैलेश शहा यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले .या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लायन नंदकुमार वाळंज, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ पूणे गणेशखिंड चे अध्यक्ष मुकेश गदिया, रिजन चेअरमन लायन आनंद खंडेलवाल, झोन चेअरमन लायन अनंत गायकवाड, लायन श्याम खंडेलवाल, लायन राजेंद्र गोयल, लायन आनंद आंबेकर, लायन सुनील चेकर, लायन हेमराज मेघनानी, लायन सतीश राजहंस, लायन डॉ शाळीग्राम भंडारी, लायन महेशभाई शहा, लायन प्रशांत शहा, लायन डॉ हिरालाल खंडेलवाल, लायन राजेश अगरवाल, लायन गिरीष पारख, लायन मुबसिर कॉन्ट्रॅक्टर, लायन संजय गोळपकर व विविध क्लब चे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी माजी उपनगराध्यक्षा आरोहिताई तळेगावकर, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पूजारी, माजी उपनगराध्यक्ष धीरूभाई कल्याणजी, भरत अगरवाल पतसंस्थेच्या अध्यक्ष लता भाभी अगरवाल, डॉ शैलेश शहा, माजी नगरसेवक संजय गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, लोणावल्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात लायन राजेश मेहता व डॉ हेमंत अगरवाल यांचा प्रांतपाल विजय भंडारी यांनी विशेष सत्कार केला.

लायन मीनाक्षी गायकवाड यांनी गणेश वंदना सादर केली,
लायन रमेश लुणावत, लायन हेमंत अगरवाल, लायन अमित अगरवाल, लायन विवेक घाणेकर, लायन रामदास दरेकर, लायन बनवारी गुप्ता, लायन विजय रसाळ, लायन समीर भल्ला यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
लायन कीर्ती अगरवाल, लायन स्मिता गुजर, लायन वैशाली साखरेकर, लायन. सुनीता रावण, लायन. नूतन घाणेकर, लायन. मिता भल्ला यांनी सर्वांचे स्वागत केले.लायन रमेश लुणावत यांनी आभार प्रदर्शन केले.

लायन. उमा मेहता, लायन. प्राची पाटेकर, लायन प्रतिभा दरेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!