क्रीडा व मनोरंजनपिंपरी चिंचवड

पीसीईटी मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा..

Spread the love

पीसीईटी मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा..National Sports Day celebrated with enthusiasm in PCET..

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, पिंपरी, पुणे  ४ सप्टेंबर २०२३.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) निगडी संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पीसीईटी अंतर्गत असणाऱ्या विविध महाविद्यालयांच्या संघांसाठी आंतर पीसीईटी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पीसीसीओई संघाने विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय निगडी, पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक निगडी, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय रावेत तसेच एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय रावेत या चार संघांनी सहभाग घेतला होता. अटीतटीच्या अंतिम सामन्यात पीसीसीओई, निगडी संघाने एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय रावेत संघाचा ३-२ गोल फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.

स्पर्धेचे आयोजन पीसीसीओई निगडीचे शारिरीक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. संतोष पाचारणे, पीसीसीओईआर रावेतचे शारिरीक शिक्षण व क्रीडा संचालक मिलिंद थोरात, एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रदीप कासार यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!