आरोग्य व शिक्षण

रोटरीक्लब व महिला दक्षता समितीच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर

Spread the love

तळेगाव : येथील रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व महिला दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगावातील पोलीस बांधवांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्षाबंधनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या शिबिरात महिला दक्षता समितीच्या वतीने पोलिस बांधवांना राख्या बांधण्यात आल्या.

या आरोग्य शिबिरात 65 पोलीस कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांची साखर व रक्तदाब तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन नामांकित डॉक्टरांनी केले. तसेच यावेळी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषधांचे व गोळ्यांचे, मसाज ऑईल यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी अध्यक्ष आनंद असवले यांनी केले. तर आभार दक्षता समिती अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. नेहा कुलकर्णी, डॉ. ज्योती मुंदर्गी नगरसेविका वैशाली दाभाडे व guffice pharma यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक शहाजी पवार, प्रकल्पप्रमुख डाॅ. नेहा कुलकर्णी, महिला दक्षता समिती अध्यक्ष व नगरसेविका वैशाली दाभाडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद असवले, उपाध्यक्ष अनिष होले, सचिव उद्धव चितळे, यादवेंद्र खळदे, विलास जाधव, राजेंद्र पोळ, मंगेश गरोळे, संजय अडसूळ, महेश महाजन ,अरुण बारटक्के व दक्षता समिती सदस्य उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!