आरोग्य व शिक्षण

एसएसएन नर्सिंगस्कूलच्या विद्यार्थ्यांचा शपथविधी आणि लाइटिंग दि लॅम्प समारंभ उत्साहात संपन्न

Spread the love

तळेगाव : येथील तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित एसएसएन नर्सिंगस्कूलच्या विद्यार्थ्यांचा शपथविधी आणि लाइटिंग दि लॅम्प समारंभ मंगळवार दि.15 मार्च रोजी अत्यंत प्रसन्न व पवित्र वातावरणात तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या रिक्रिएशन हॉलमध्ये पार पडला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विना तेलोरे,विशेष अतिथी महेशभाई शहा आणि नर्सिंग स्कूलचे पालकमंत्री डॉ. शाळीग्राम भंडारी या मान्यवरांचे नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीताने स्वागत केले.मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या  मोनालिसा पारगे यांनी स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या तीनही परीक्षेतील 100% प्रगतीचा आलेख सादर केला .त्यानंतर पासिंग दि लाइट हा समारंभ प्रिन्सिपल आणि मुख्य पाहुणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.त्याबरोबरच नर्सिंग स्कूलच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा “नर्सिंगची शपथ” घेण्याचा कार्यक्रम उपप्राचार्य स्नेहा आवटे यांनी केला.

शिक्षण आणि नर्सिंग क्षेत्रातील प्रचंड अनुभव असलेल्या मुख्य पाहुण्या विना तेलोरे यांनी रुग्णसेवा करताना परिचारिकेच्या कर्तव्याची जाणीव अतिशय योग्य आणि मार्मिक शब्दात उपस्थितांना करून दिली. विशेष अतिथी  महेशभाई शहा यांनी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका कडून समाज काय अपेक्षा करतो?- हेही आपल्या मनोगतात व्यक्त केले. त्यानंतर नर्सिंग स्कूलचे पालकमंत्री डॉ. भंडारी यांनी जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक कसा असावा?- हे अनेक प्रसंग आणि शेरोशायरीच्या माध्यमातून मनोगतातून सांगितले.

रणभिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले. तर स्मिता कदम यांनी  आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!