आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

१० वी १२ वी नंतर पुढे काय ?

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तळेगाव स्टेशन व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या इ.१० वी १२ वी नंतर पुढे काय या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे व सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.विजय नवले यांचे हस्ते करण्यात आले.

Spread the love

१० वी १२ वी नंतर पुढे काय ? What next after 10th 12th?

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर ७ मे..

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तळेगाव स्टेशन व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या इ.१० वी १२ वी नंतर पुढे काय या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे व सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.विजय नवले यांचे हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी अध्यक्ष विन्सेंट सालेर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण मखर, कार्यवाह देवराम पारिठे, सुदाम दाभाडे, विलास टकले, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सोनबा गोपाळे , पांडुरग पोटे , सुनील खोल्लम मिलिंद शेलार , शिक्षक परिषद उपाध्यक्ष, श्रीनिवास गजेंद्रगडकर, सोपान असवले, सल्लागार संघटक संजय वंजारे रो. अंतोष मालपोटे संदिप मगर, मुख्याध्यापक शमशाद शेख पर्यवेक्षक रेणू शर्मा, वरील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिन्ही संस्थांचे मार्गदर्शक संतोष खांडगे यांनी केले ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आपले करिअर घडवावे .
प्रा.विजय नवले यांनी करिअरची अनेक नवनवीन क्षेत्र निवडुन अभ्यासात सातत्य ठेवुन आपल्या ध्येयापर्यंत पोहचावे.पालकांनी स्वतःच्या इच्छा मुलांवर लादू नये त्यांच्या आवडीप्रमाणे मुलांना प्रोत्साहन द्यावे . उत्तम शिक्षण घेतल्या नंतर आपल्या देशाचे व आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले. प्रा. सत्यजित खांडगे यांनी ही मनोगत व्यक्त केले. व्याख्यात्यांचा परिचय रो.दशरथ जांभूळकर यांनी केला , कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन लक्ष्मण मखर यांनी तर सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी व प्रकल्प प्रमुख गणेश ठोंबरे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तिन्ही संस्थांचे पदाधिकारी व स्वामी विवेकानंद स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!