ताज्या घडामोडी

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा – २०२३

Spread the love

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी, मराठी भाषा समिती, जिल्हा रत्नागिरी, कोकण मराठी साहित्य परिषद व केशवसुत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा – २०२३ आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी निकष पुढीलप्रमाणे –

१. स्पर्धेतील सादरीकरण हे लोककला ( गोंधळ, भारुड, नमन, पोवाडे इत्यादी) प्रकारातील असावे
२. स्पर्धेतील सादरीकरणासाठी ४ ते ५ मिनिटे कालावधी असेल.
३. सदर स्पर्धा दोन गटात होईल.
४. गट क्रमांक १ – १६ वर्षे खालील.
५. गट क्रमांक २ – १६ वर्षे वरील.
६. सादरीकरण मराठी भाषेतूनच असावे.
७. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
८. सादरीकरण करताना संघात किमान ५ स्पर्धक असावेत.

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क 

श्रीम. पूजा झोरे मॅडम, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी – ९४०५७००१२७
श्री. अरुण मोर्ये – ९१७५५२६६६०
सौ. स्मिता बापट – ९४२१२३३८७९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!