ताज्या घडामोडी

मुरूमच्या जिल्हा परिषद प्रशालेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

Spread the love

मुरुम, ता. २४ (प्रतिनिधी)

येथील जिल्हा परिषद प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी (ता. २३) रोजी पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर मंमाळे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ, सपोनि पवन इंगळे, केंद्रप्रमुख धनराज गिरी, विजयकुमार कोळी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चांदपाशा गवंडी, उपाध्यक्ष राचप्पा दुर्गे, उमाकांत मंगरुळे, विकासेसोचे माजी व्हाईस चेअरमन प्रमोद आबा कुलकर्णी, व्यंकटराव चौधरी, विलास कंटेकुरे, तानाजी बिराजदार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी दत्ता चटगे, गोविंद पाटील, पिंटू येळापूरे, श्रीकांत बेंडकाळे, बबन बनसोडे, राजू मुल्ला, कलशेट्टी, तुळशीराम देडे , दत्ता हुळमुजगे आदी उपस्थित होते. स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी ४५ गाण्यावर आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले. यामध्ये देशभक्तिपर गिते, लोकगीते, भक्ति गिते, भारुडे, विनोदी गीते आदिंचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार देशमाने यांनी केले. सूत्रसंचलन व आभार प्रविण ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू पवार, संतोष कडगंचे, हरिभाऊ माकणे, सत्तेश्वर भिसे, गणेश सराफ, उमाकांत तांदळे श्रीमती प्रमिला तुपेरे, रेखा निंबाळकर, निर्मला यादव, संगिता माने आदींनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!