आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

अटकेपार झेंडा – आखाती देशातील भव्य शिवजयंती दुबई , युएई येथे संपन्न..

स्वराज्य स्थापन करून गरीब जनतेची सेवा करणारा जगप्रसिद्ध राजा अशी ख्याती असणाऱ्या श्रीमंत छत्रपतींची जयंती आखातामधील यूएई मध्ये दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी करण्यात आली.

Spread the love

अटकेपार झेंडा – आखाती देशातील भव्य शिवजयंती दुबई , युएई येथे – १९ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न.

Atkepar Zenda – Grand Shiv Jayanti in Gulf Countries – Dubai, UAE – held on 19 February 2023.

आवाज न्यूज : विशेष प्रतिनिधी, २४ फेब्रुवारी.

मराठी माणूस देशात असुदे की परदेशात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विसरुच शकत नाही. स्वराज्य स्थापन करून गरीब जनतेची सेवा करणारा जगप्रसिद्ध राजा अशी ख्याती असणाऱ्या श्रीमंत छत्रपतींची जयंती आखातामधील यूएई मध्ये दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी करण्यात आली.या भव्य आयोजनाचे हे ५ वे वर्ष होते व दुबईतील जे एस एस स्कूल याठिकाणी करण्यात आले.

आयोजकांच्या धाडसी प्रयत्नाला मनंपुर्वक शुभेच्छा देण्यासाठी यंदाचे प्रमुख पाहुणे दिलीप औटी साहेब खास महाराष्ट्रातून उपस्थित होते, या कार्यक्रमा साठी ते खास महाराष्ट्रातून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या व इतर मान्यवरांच्या शुभेच्छा संदेश व पत्र घेऊन आले होते.
महाराष्ट्र सरकारने या भव्य अश्या शिवजयंतीची दखल घेतली त्या करिता आयोजकांकडून त्यांचे आभार मानले गेले व त्यांनी या पुढेही असेच शिवकार्य चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करतील अशी भावना व्यक्त केल्या.

 

आखातात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान ईतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या ईन्स्पायर इव्हेंट्स युएई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्राची लोककला पोवाडा, भारुड, लेझीम, लावणी यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात आले.त्रिविक्रम ढोल ताशा यूएई च्या सहकार्यानी भव्य असे ढोल ताशा वादन करण्यात आले.

या कार्यक्रमास दुबईतील विजयेंद्र सुर्वे,राहुल घोरपडे व इतर उद्योजक व समाजसेवी संघटनांनी सहकार्य केले व सागर जाधव ( एस.जे.लाईव ) यांनी हा कार्यक्रम क्रेझी फुडी रांजिता व इंडियन मॉम इन यूरोप यांच्या सहकार्याने जगातील सर्व शिवप्रेमीं पर्यंत ऑनलाईन लाईव माध्यमातून पोहोचवला.

युएईतील २००० हुन अधिक मराठी व आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला व कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
वरील कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक, चंद्रशेखर जाधव,चैताली जाधव, सुहास हांडे व सहकारी पल्लवी बारटके,मंगेश कासार,साक्षी मोरे, संदीप पवार,प्रशांत शिंपी,संदीप शिंपी,अभिजित देशमुख,संतोष भस्मे,रितेश मोरे, अनिश कोटवडे,शिवाजी नारूने,मंदार कुलकर्णी,किशोर मुंडे व इतर सर्व सहकार्यांनी अथक मेहनत घेऊन भव्य शिवजयंती साजरी केली व अटकेपार झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवला..

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!