ताज्या घडामोडी

जायंटस ग्रुपच्या अध्यक्षपदी कोंकण प्रांतातून विनायक राऊत यांची नियुक्ती

Spread the love

जायंटस वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन २-ड कौन्सिल पदग्रहण व शपथविधी उत्साहात

जाकादेवी/वार्ताहर- जायंटस वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन २-ड सन २०२२-२०२३ या वर्षीच्या नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण व शपथविधी भक्त निवास गणपतीपुळे येथे उत्साहात संपन्न झाला.या जायंटस ग्रुपच्या अध्यक्षपदी शैक्षणिक व सामाजिक कार्यात क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले विनायक राऊत यांची नियुक्ती करण्यात आली.
जायंटस ग्रुप ऑफ मालगुंड-गणपतीपुळे या ग्रुपने गेली २२ वर्ष अगदी सुरुवातीपासून अतिशय निष्ठेने सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य, कलाविषयक, अनेक उपक्रम राबवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.या ग्रुपच्या सेवाभावी उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन जायंटस वेलफेअर फेडरेशन,फाउंडेशन २-ड ची सन २०२२-२०२३ या वर्षीच्या नुतन कार्यकारिणीत जायंटस वेल्फेअर फेडरेशन ड- चे अध्यक्ष म्हणून मालगुंड येथील शैक्षणिक- सामाजिक- क्षेत्रातील नावाजलेले अग्रगण्य व्यक्तिमत्त्व असलेले विनायक तुकाराम राऊत यांची कोंकण प्रांतातून अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
कामावर निष्ठा ठेवून अतिशय अभ्यासपूर्ण आणि अचूक नियोजनानुसार कोणताही उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात विनायक राऊत यांचा हातखंडा आहे. स्वतः ला झोकून देऊन त्यांनी आजपर्यंत अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.स्पष्टे वक्ते आणि अचूक नियोजनानुसार योग्य कार्यवाहीला ते महत्व देत आले आहेत.विनायक राऊत यांनी जायंटस ग्रुपच्या माध्यमातून अथवा आजपर्यंत त्यांनी अनेक क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना जायंटस वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन 2-ड या जायंटस ग्रुपच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.या अध्यक्षपदाचा पदभार त्यांनी स्वीकारला.
जायंटस ग्रुपचे नुतन अध्यक्ष विनायक राऊत व जायंटस ग्रुपचे सर्व कौन्सिल सदस्य यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा गणपतीपुळे येथे संपन्न झाला.
२०२२-२०२३ ची नूतन कार्यकारिणी याप्रमाणे- अध्यक्ष म्हणून मालगुंड गणपतीपुळे येथील विनायक राऊत ,आय.पी.पी- संजय पाटणकर,उपाध्यक्ष-भूषण मुळ्ये, उपाध्यक्ष-प्रकाश कारखानीस, उपाध्यक्ष- गजानन गिड्ये, सचिव-अमित मेहेंदळे, खजिनदार-माधुरी कांबळे, पी.आर.ओ. प्रवीण डोंगरे तसेच फेडरेशन डायरेक्टर म्हणून प्रतिभा प्रभूदेसाई, ज्योती कारखानीस, सुभाष पाटील, फेडरेशन ऑफिसर म्हणून धीरजलाल पटेल,राजेश गांगण,पूनम नाळकर, नेहा सहस्त्रबुद्धे,माधुरी केळकर,संजय संसारे आदींचा समावेश आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मालगुंडचे माजी सरपंच तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर ,तसेच केंद्रीय समिती सदस्य,जायंटस वेलफेयर फाउंडेशनचे प्रमोद शहा, डॉ.सतीश बापट, डॉ. अनिल माळी, ॲड.विलासराव पवार,रामनारायण उंटवाल,डॉ. मिलिंद सावंत.डॉ. राजकुमार पोळ, जायंटस वेलफेयर फाउंडेशनचे पदाधिकारी, तसेच किशोर पाटील, संदीप कदम, श्रीकांत मेहेंदळे, रोहित मयेकर, प्राध्यापक अमोल पवार, योगेश चव्हाण यांसह शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान सचिव विनायक राऊत यांची जायंटस ग्रुपच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी शिक्षण संस्थेच्यावतीने त्यांचे खास अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!