ताज्या घडामोडी

शून्यातून विश्व निर्माण करत असलेले व्यक्तिमत्व पत्रकार संजयजी महाजन

Spread the love

जिवेत शरद शतम् !

संजय विठ्ठल महाजन प्रेरक व्यक्तिमत्व…
यांचा आज 50 वा वाढदिवस प्रथमतः मनस्वी शुभेच्छा…
यानिमित्त – साईश्रध्दा प्रतिष्ठान शिर्डीचे संस्थापक व अध्यक्ष आणि पत्रकार संजय महाजन साहेब यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या आत्तापर्यंतच्या खडतर आणि जिद्दी जीवनप्रवासाविषयी थोडेसे लिहावेसे वाटते…
सामाजिक कार्यकर्ते संजय महाजन साहेब यांचा जन्म 9 मे 1971 रोजी धुळे जिल्ह्यातील न्याहळोद येथे झाला, जन्मता हाच आईचे छत्र हरपले शिक्षण घेत असताना क्रीडा क्षेत्रात देखील सर्वोच्च कामगिरी करत रनिंग मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र हे आजही त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा करून देत आहे, सर्वांच्या हितासाठी सदैव तत्पर रहात गोर गरीब जनतेच्या कल्याणासाठी स्वतः अडचणीत राहून देखील इतराना मदतीची भावना मनात ठेवत सदैव कार्यरत असे मितभाषी व्यक्तिमत्व म्हणजे संजू भाऊ, श्री संजय महाजन होय… अनेक वर्षांचा खडतर प्रवास त्यांनी करत शिर्डीच्या साईबाबांना स्मरण करत त्यांची सेवा करत आपले आयुष्य व्यतीत केले आहे, लहानपणी डोक्यावरचे कौटुंबिक छत्र जरी त्यांना मिळाले नसले तरी साई रुपी माय बाप नक्कीच मिळाले आहेत,
सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याने संजय महाजन साहेब यांनी पोलीस मित्र संघटनेत काम केले, त्यानंतर विविध सामाजिक ; सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्याच्या द्रुष्टीने यांनी साईश्रध्दा प्रतिष्ठानची स्थापना केली, सध्या विविध समजोपयोगी उपक्रम ते या माध्यमातून नेहमीच राबवीत असतात. यासोबतच समाजातील घडणाऱ्या घटना प्रतिबिंबित करणारे माध्यम म्हणजे पत्रकारिता क्षेत्र यात देखील ते वेळेचा सदुपयोग करत कार्यरत आहेत. त्यांनी बहुजन पत्रकार संघ ; ग्रामीण पत्रकार संघ, भारतीय पत्रकार संघ या पत्रकार संघनांच्या चळवळीत अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुका संघटक तसेच जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले. सध्या जिल्हाध्यक्ष – अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश व पोलीस बॉईज असोसिएशन जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून कार्यरत आहेत,
कोरोना महामारी चालू असताना पत्रकारिता करीत असताना निमोनिया तसेच कोरोनाची लक्षणे झाल्यामुळे धुळे येथील जवाहर मेडिकल येथे उपचारार्थ म्हणून जवळजवळ 16 ते 17 दिवस उपचार करून कोरोना वर त्यांनी मात केली, संजुभाऊचा मनमिळावू स्वभाव असल्याने व्यक्ति लहान आहे की मोठा याचा विचार न करता त्याच्याशी प्रेमळ व्रुत्तीने मित्रत्व जपत ते सतत मदतीची भावना जोपासतात हे त्यांच्या प्रेरक व्यक्तिमत्वातून नेहमीच प्रदर्शित होते.
आपण समाजाचे काही तरी देणे लागतो आणि समाजाने आपल्या साठी काय केले यापेक्षा आपण समाज व देशासाठी काय करू शकतो हे महत्वाचे असून सर्वांनी संकटात खचून न जाता ; भेदभाव न करता एकमेकांस सुख दुःखात मदत करण्याची भावना असायला हवी असे नेहमी आम्हा सर्वांना ते मार्गदर्शन करीत असतात, साईबाबांच्या आशिर्वाद नेहमीच मला प्रेरणा देतात व सेवेत आनंद मिळतो, अनेकांनी मला जीवनात आज येथेपर्यंत येण्यासाठी मदत केली त्यांचा मी शतशः आभारी आहे अशी भावना ते आवर्जून व्यक्त करतात, अशा या सामाजिक बांधिलकी असलेल्या या ध्येयवेड्या आणि कार्यमग्न संजय महाजन साहेब या व्यक्तीमत्वास असेच समाजहीताचे कार्य करण्यास बळ मिळो ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना आणि सर्व सहकारी यांच्या वतीने सदिच्छा.

लेखक आणि शब्दांकन ,
विशाल रायते,
( पत्रकार – दै.सकाळ )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!