ताज्या घडामोडी

युरोप दौऱ्याने भारत-फ्रांस संबंध दृढ !

Spread the love

नुकत्याच पार पडलेल्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल मैक्रो यांच्याशी झालेली भेट हा या दौऱ्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे. दोन्ही नेत्यांनी युक्रेन- रशिया युद्ध , इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थिती आणि जागतिक दहशतवाद यासारख्या द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. फ्रान्स हा युरोपमधील प्रमुख देश आहे असून जागतिक स्तरावर भारताचा जवळचा धोरणात्मक भागीदार आहे. मैक्रो हे गेल्या महिन्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत प्रतिस्पर्धी मरीन ले पिन यांचा पराभव करून सत्तेत परतले असून पुन्हा राष्ट्रपती झाल्यानंतर मैक्रोना भेटणारे पंतप्रधान मोदी हे पहिले जागतिक नेते आहेत. दोन्ही देशांमधील संबंधांचे महत्त्व संयुक्त निवेदनातून दिसून आले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की भारत आणि फ्रान्सने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदारी केली आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांमधील द्विपक्षीय चर्चा भारत-फ्रान्स संबंधांना नवी उंची देईल, अशी अपेक्षा करता येईल. भारत आणि फ्रान्सने दहशतवादाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एकजुटीवर भर दिला हे लक्षात घेण्यासारखे आहे. दहशतवादाविरुद्ध एकत्र काम करणे हा भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीचा आधारस्तंभ असल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या नकारात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी मोदी आणि मैक्रो यांनी परस्पर सहकार्य वाढविण्याचे मान्य केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा विश्वास केवळ अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाला आहे. मोदी आणि मॅक्रो यांची ही भेट दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीचा मार्ग मजबूत करेल, ज्याचा परिणाम येत्या काही दिवसांत दिसून येईल.

प्रा. विजय कोष्टी, कवठे महांकाळ (सांगली) .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!