औद्योगिकक्रीडा व मनोरंजनपिंपरी चिंचवड

टाटा मोटर्सच्या कार प्लांटने पटकाविले सर्वाधिक सुवर्णपदके..

स्पर्धेला कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Spread the love

टाटा मोटर्सच्या कार प्लांटने पटकाविले सर्वाधिक सुवर्णपदके ; स्पर्धेला कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.Tata Motors Car Plant Wins Most Gold Medals; Spontaneous response of companies to competition.

आवाज न्यूज : गुलामअली भालदार, चिंचवड प्रतिनिधी, १९ सप्टेंबर.

क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या वतीने भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटरमध्ये दोन दिवसीय 38 वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टर आजवर इतिहासात यावेळी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आले.त्यात राज्यभरातील 81 कंपन्यांतील 331 संघातून 1480 स्पर्धकांनी या सहभाग घेतला. या स्पर्धेत 283 केसस्टडी, 19 स्लोगन व 29 पोस्टर्स सादर करण्यात आले. स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदके टाटा मोटर्स कंपनीने पटकाविले.

स्पर्धेत टाटा मोटर्स, कार प्लान्ट, जेसीबी इंडिया, किर्लोस्कर मिंडा, थरमॅक्स, लुमॅक्स, एक्साइड, इंडस्टीज कॉमिन्स, बडवे, टाटा ऑटो कॉम्प, समुह कंपन्या, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड थिसेनक्रुप, एल.अ‍ॅन्ड टी. डिफेन्स व इतर कंपन्यांनी या राष्ट्रीय अधिवेशनात सहभाग नोंदविला.
राष्ट्रीय अधिवेशनाचे पहिल्या दिवशी झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन टाटा मोटर्स कंपनीतील कार प्लान्टचे विभाग प्रमुख श्यामसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी थिसेनक्रुपचे ऑपरेशन विभागाचे संचालक अभय घिरणकर, संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरचे प्राचार्य डॉ.एम.ए. व्यंकटेश, फोरमचे कौन्सिल सदस्य व अ‍ॅक्युरेट इंजिनिअरिंगचे विक्रम साळुंखे उपस्थित होते.

विविध कंपनीतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके टाटा मोटर्स कंपनीतील कार प्लान्टचे विभाग प्रमुख श्याम सिंग, जेसीबी इंडिया प्लांट कंपनीतील ऑपरेशन विभाग प्रमुख अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सुवर्ण, रजत व रौप्यपदके, स्मृतीचिन्ह स्वरूपात प्रदान करण्यात आले.
38 वे राष्ट्रीय अधिवेशनाचे दुसर्‍या दिवशी स्पर्धेचे उद्घाटन सी.आय.ई. इंडिया कंपनीतील कॉर्पोरेट क्वॉलिटी हेड राहुल राजे, एम.आय.टी. पुणेच्या असोसिएट्स डीन डॉ. स्वाती बनकर यांच्याहस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार जेसीबी इंडिया प्लांटचे ऑपरेशन हेड संजीव सोनी यांच्या हस्ते सुवर्ण, रजत व रौप्यपदके, स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे उद्घाटक व प्रमुख मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.

38 वे राष्ट्रीय अधिवेशनातील दोन्ही दिवसात उपस्थित मान्यवरांचे सत्कार क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे यांच्याहस्ते करण्यात आले. तर, स्वागत पुणे चॅप्टर फोरमच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा परीचय फोरमचे पदाधिकारी माधव बोरवणकर व प्रकाश यार्दी यांनी केले. सूत्रसंचालन फोरमच्या विजया रूमाले यांनी तर, आभार फोरमचे पदाधिकारी संजीव शिंदे यांनी मानले. स्पर्धेचे नियोजन चंद्रशेखर रूमाले व प्रशांत बोराटे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!