आंदोलनमहाराष्ट्र

फक्त सहा महिन्यांसाठी नायब तहसीलदाराची कंत्राटी पद्धतीने भरती..

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची जाहिरात..

Spread the love

फक्त सहा महिन्यांसाठी नायब तहसीलदाराची कंत्राटी पद्धतीने भरती, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची जाहिरात.Recruitment of Naib Tehsildar on contractual basis for six months only, Jalgaon Collectorate Advertisement.

आवाज न्यूज : जळगाव वार्ताहर, २९ सप्टेंबर.

आपण अधिकारी बनावं यासाठी राज्यातील लाखो विद्यार्थी जीव ओतून दिवस-रात्र अभ्यास करत आहेत. यापैकी अनेक विद्यार्थ्यांचा पाच ते सहा वर्षांपासून अभ्यास सुरु आहे. असं असताना आता थेट अधिकाऱ्यांच्या पदासाठी अवघ्या सहा महिन्यांची कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर झाल्याची माहिती समोर आलीय.फक्त सहा महिन्यांसाठी नायब तहसीलदाराची कंत्राटी पद्धतीने भरती, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची जाहिरात
29 सप्टेंबर 2023  राज्य सरकारने सरळ सेवा भरती कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा हिरमोड झाला. सरकारचा सरळ सेवा भरती कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय ताजा असताना जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून एक जाहिरात प्रदर्शित करण्यात आलीय. या जाहिरातीत नायब तहसीलदार, संगणक चालक, कारकून, लिपीक, शिपाई पदांटी फक्त तीन महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आलीय. विशेष म्हणजे ही कंत्राट भरती तीन महिन्यांसाठी असेल तसेच आवश्यकता असल्यास पुढील तीन महिने नोकरी कायम राहील, असं नमूद करण्यात आले आहे

संबंधित जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या जाहिरातीवर एमपीएससी विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलाय. तहसीलदार पदासारखी जागा कंत्राटी पद्धतीने भरली तर आम्ही करणार काय? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांची भूमिका अतिशय योग्य आहे. कारण कोरोना संकटामुळे दोन वर्ष कोणतीही भरती झाली नाही. त्यानंतर आता सरकारने 138 संवर्गातील शासकीय पदं ही कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे सरळ सेवा भरतीचं 9 कंपन्यांना कंत्राट दिलं जाणार आहे. यापैकी काही कंपन्या या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या असल्याची चर्चा आहे. या कंपन्यांना भरतीसाठी सरकारकडून कमिशनही मिळणार आहे. सरकारचा कंत्राट भरतीचा हा जीआर ताजा असताना अवघ्या सहा महिन्यांच्या कंत्राट भरतीचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची जाहिरात समोर आलीय. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होणार आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जाहिरातीत नेमकं काय म्हटलंय?
1) लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी, जळगाव, (2) सक्षम प्राधिकारण तथा उप विभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव (3) सक्षम अधिकारी, तथा उप विभागीय अधिकारी, भुसावळ भाग, भुसावळ (4) सक्षम प्राधिकारण तथा उप विभागीय अधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर (5) सक्षम प्राधिकारण तथा उप विभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा आणि (6) सक्षम प्राधिकारण तथा उप विभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगांव या कार्यालयांतील पुढील पदांवर मासिक मानधन तत्वावर कामकाज करण्यासाठी केवळ तात्पुरता स्वरुपात ६ महिन्यांचे (प्रथम 3 महिने आणि आवश्यकता असल्यास पुढील 3 महिने) कालावधीसाठी पुढील अटी-शर्ती बंधनकारक ठेवून पात्र सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी आणि उमेदवारांची नियुक्ती करायची आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी या जाहिरातीवर स्पष्टीकरण दिलं आहे. “मला मदत करण्यासाठी, माझे कोर्ट-कचेरीच्या कामांना सहकार्य करण्यासाठी, माझे प्रश्न समजून घेण्यासाठी, ऑर्डरची ड्राफ्टिंग करण्यासाठी आपण नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी जाहिरात काढली आहे. ही जाहिरात काढण्यापूर्वी भारत सरकारची परवानगी घेण्यात आली आहे”, असं स्पष्टीकरण जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

नाना पटोल यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जाहिरातीवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. पटोले यांनी या मुद्द्यावरुन सरकारला काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा ईशारा दिला.

“शेतकरी, कामगार, कष्टकरी, नोकरदार, छोटे व्यापारी यांचे आयुष्य उद्ध्वस्थ केल्यानंतर आता अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांचे भविष्य उद्धवस्त करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार आणि नायब तहसिलदार पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात तात्काळ रद्द करुन सरकारने नोकर भरतीसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडावी अन्यथा तरुणांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल”, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!