महाराष्ट्रमावळ

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मावळ लोकसभा प्रवासावर..

घर चलो अभियान, पदाधिकारी-सुपर वॉरिअर्सशी संवाद.

Spread the love

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मावळ लोकसभा प्रवासावर; घर चलो अभियान, पदाधिकारी-सुपर वॉरिअर्सशी संवाद.State President Bawankule Maval on Lok Sabha trip; Ghar Chalo Abhiyan, interaction with office bearers-Super Warriors.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी १० ऑक्टोबर.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात बुधवार 11 ऑक्टोंबर रोजी ते पश्विम महाराष्ट्रातील मावळ लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील (पुणे व रायगड जिल्हा) सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व ‘संपर्क से समर्थन’ अभियानात भाग घेणार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. बुधवारी दुपारी 12.15 वा. पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत व पनवेल आणि दुपारी 4.00 वा. चिंचवड येथील राधा लॉन्स काळेवाडी येथे पुणे जिल्ह्यातील पिपंरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी संवाद साधतील.सकाळी 11.00 वा. पनवेल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कर्मवीर भाऊराव पुतळा चौकपर्यंत आणि सायं 6.00 वा. चिंचवड येथे शगून चौक ते साई चौकपर्यंत ‘घर चलो अभियानात सहभागी होतील व सर्वसामान्य जनतेशी हितगुज करणार आहेत. यासोबतच ते लोकसभा मतदारसंघातील येथील काही महत्वाच्या व प्रतिष्ठीत व्यक्तींच्या स्नेह भेटी घेणार आहेत.

 

प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, राज्य लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, लोकसभा निवडणूक प्रमुख आ. प्रशांत ठाकूर, रायगढ उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष शंकर जगताप, आ. अश्विनी जगताप, परेश ठाकूर, अरुणशेठ भगत, दीपक बेहेरे, नामदेव ढाके, शीतल शिंदे, तुषार हिंगे यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!