ताज्या घडामोडी

सर्व सामान्य माणसालाही वाटते आपणच मुख्यमंत्री आहे” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Spread the love

रविवार दिनांक २४जुलै २०२२रोजी रोजी मुंबई मधील बांद्रा यथील रंगशारदा भवनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सकल धनगर समाजा तर्फे जाहिर सत्कार करुन आपल्या प्रलंबीत मागण्याचे निवेदन देण्यात आले.महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या धनगर समाज बांधवां समोर मुख्यमंत्री सत्कार प्रसंगी मागण्या,निवेदन बाबत खुलासा करताना म्हणाले,” १००० कोटीच्या निधीचे नियोजन गेल्या अडीच वर्षात झाले नाही, पण ते आम्ही नक्कीच करु.,मी तुमच्या समोर उभा आहे ,मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना,एक सर्वसामान्य कार्यकर्ता ही राज्याचा मुख्यमंत्री बनू शकतो.हे जनतेने दाखवून दिले.बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेबांच्या विचाराने प्रेरीत होऊन मी मुख्यमंत्री झालो.मुख्यमंत्री झालो पण या करेक्ट कामासाठी मी तीन दिवस एक मिनिटही झोपलो नाही, एक एक करीत ५०आले,आम्ही बंडखोर नसून क्रांतीकारी आहोत,जगातील ३३ देशानी याची दखल घेतली आहे,आम्हाला पंतप्रधान नरेंद्र माेदींचाही आभिमान वाटतो,हे सरकार सर्वसामान्यांचे,शेळीमेंढी पालन वाले,पानटपरी वाले,रिक्षा वाले,भाजी विक्रेत्या चे आहे,पंढरपूर ला मी पाहिले जिकडे तिकडे माणसेच माणसे दिसत होती.१०लाख लोकांनी हात उंचाऊन मला मुख्यमंत्री झाल्याच्या हासून शुभेच्छा दिल्या. तुमच्या हक्कांचा भाऊ मुख्यमंत्री झालाय.तुम्हाला न्याय देण्याचे काम आम्ही नक्कीच करु.ओबीसीं आरक्षणाबाबत मी दिल्लीला तीन वेळा गेलो,न्यायालयीन कामकाजासाठी पुरावे,डेटा लागतो,तो आम्ही अतिशय उत्तमरित्या मांडला.धनगर बांधवांच्या आरक्षणाबाबत ‘ र’ व ‘ ड ‘मध्ये घोळ करुन ठेवलाय.आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्यांचा जरुर विचार केला जाईल. वाड्यावस्ती मधील रस्ते,पाणी,व इतर विकास करायचा आहे,सुधारणा करायच्या आहेत,आपल्या मागण्या संदर्भात योगेश जानकर बरोबर बैठक घेऊन जे जे प्रामाणिकपणे करायला पाहिजे ते सरकार करेल.याची खात्री देतो.आंदोलनकारी कार्यकर्ता वर झालेल्या सर्व केसेस मागे घेण्यात येतील,आरक्षण आंदोलनात तीन लोकांनी आत्मदहन केले,त्यांना १०लाख रुपये देऊ,व नोकरीचाही विचार करु.धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आदिवसी च्या सवलती मिळतील. याबाबबत ही आपण योजना राबवू.१०००क़ोटीच्या निधीची तरतूद केली जाईल.चराऊ जागेबाबत, शेळीमेंढी महामंडळ सक्षम करण्यासाठी माहिती घेऊ,अभ्यास करु.तपासून घेऊ.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राष्ट्रांसाठीमहान कार्य केले.पंतप्रधान नरेन्द्र मोदीजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्यापुढे नतमस्तक होतात,चौंडी येथे राष्ट्रीय स्मारक करु.स्व.गणपतराव देशमुख ११वेळा निवडणूकीत निवडूण आले,त्यांच्या स्मारकासाठी आपण बाबी तपासून काम करु.तुमची जेवढी सेवा करता येईल तेवढी नक्कीच करु.अहमदनगरचे अहिल्यानगर करण्यासाठी बाबी तपासून पाहू व करु.हे राज्य सर्वसामान्यांना न्याय देणारे असून राज्याचा विकास हाच आमचा उद्देश असेल.”या वेळी राज्याचे मुख्यमंत्री धनगर समाज बांधवांनी दिलेल्या मागण्याच्या निवेदनाबाबत सकारात्मक असल्याचे दिसून येत होते,त्यामुळेच रंगशारदा भवनातील जमलेल्या धनगर समाज बांधवांत उत्साहाचे,आनंदाचे,जल्लोषाचे वातावरण झाले होते.धनगर समाजातील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पुरुष व महिला या प्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!