आंदोलनमहाराष्ट्रमावळ

जनरल मोटर्स कंपनीमधे कामगारांच्या मागण्यांसाठी उपोषणाबाबत मुख्यमंत्री दालनात शिष्टमंडळातील सदस्यांसह आमदार, खासदारांची बैठक संपन्न..

Spread the love

जनरल मोटर्स कंपनीमधे कामगारांच्या मागण्यांसाठी उपोषणाबाबत मुख्यमंत्री दालनात शिष्टमंडळातील सदस्यांसह आमदार , खासदारांची बैठक संपन्न..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर,  लोणावळा प्रतिनिधी १८ ऑक्टोबर.

जनरल मोटर्स कंपनीमधे कामगारांच्या मागण्यांसाठी उपोषणाबाबत मुख्यमंत्री दालनात शिष्टमंडळातील सदस्यांसह आमदार , खासदारांची बैठक संपन्न झाली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी जनरल मोटर्स कामगार बांधवांच्या मागण्यासंदर्भात मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे , आमदार सुनिलआण्णा शेळके यांची कामगारमंञी.उदयजी सावंत यांचेसह बैठक संपन्न झाली. यामधे सकारात्मक चर्चा होऊन कामगारांना चांगले पॕकेज द्यावे , असे मुख्यमंत्री.शिंदे यांनी कंपनीला निर्देश दिले.

कामगार बांधव आणि जनरल मोटर्स यांच्यामध्ये सामंजस्याने झालेल्या करारातील अटी-शर्तींचा विचार न करता,कामगार बांधवांची बाजू न ऐकता कामगार मंत्रालयाकडून क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला. त्यामुळे या कामगारांवर आज नोकरी गमावण्याची नामुष्की ओढवली.व या एक हजार कामगारांना न्याय मिळेल या भावनेने हे उपोषण सुरु आहे.ही वस्तुस्थिती मा.मुख्यमंत्र्यांकडे सविस्तरपणे मांडली.
“जनरल मोटर्स कंपनीने पुन्हा नव्याने अधिकची समाधानकारक भरपाई द्यावी आणि जर कामगारांना ही भरपाई मान्य नसेल तर ह्युंदाई कंपनीला नुकसानभरपाई देऊन आम्ही सरकार म्हणून कामगारांना कंपनीत सामावुन घेण्यासाठी आग्रही भुमिका घेऊ.”असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले आहे.

राज्य सरकारची बाजु मांडण्याकरिता उद्योग मंत्री.उदयजी सामंत गुरुवारी उपोषण स्थळी येऊन सर्व कामगार बांधवांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहेत.त्यानंतर आपण आपली भूमिका ठरवू,असे कामगारांनी यावेळी आवाज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!