आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

येवल्यात प्रांत अधिकारी सोपान कासार यांना अटक करण्यासाठी धरणे आंदोलन.

Spread the love

नाशिक : येवला तालुक्यातील सायगाव येथे कार्यरत असलेल्या महिला तलाठी यांनी विनयभंग व शरीर सुखाची मागणी प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी प्रांताधिकारी सोपान कासार यांना अटक करून सेवेतून निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी सर्व पक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले.

येवला शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्वपक्षीय आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. येवला शहर पोलीस ठाण्यात तलाठी महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असता अटक केली नाही म्हणून आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त करत महिलेचा समर्थनार्थ आंदोलन करत प्रांताधिकारी कासार यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

तलाठी महिलेला न्याय मिळावा म्हणून चार ते पाच तास आंदोलन चालल्यानंतर तहसीलदार प्रमोद हिले यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन देण्यात येवुन वरिष्ठ स्तरावरुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

सदर आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचा महिला तालुकाध्यक्ष संगीताताई साबळे, जिल्हा संघटक शबनमभाभी शेख, जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई साबळे, संगीताताई अहिरे, वंचित बहुजन आघाडीचे संजय पगारे, दयानंद जाधव, भानुदास पठारे, युवा नेते शशिकांत जगताप, भाऊसाहेब अहिरे, शिरीष पानपाटील, वसंत घोडेरावं, विकास दूनबळे, रिपब्लिकन सेनेचे दिपक लाठे, रिपाईचे बाळासाहेब कसबे, महेश वाघ, मंगेश शिंदे, अतुल धिवर, हरी अहिरे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!