Puneक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

६६ व्या महाराष्ट्र केसरी, पुणे शहर संघाची निवड चाचणी.

पुणे शहर संघ निवड चाचणी कुस्ती स्पर्धा रविवार दिनांक २९ ऑक्टोंबर २०२३ रोजी रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे घेण्यात येणार. शिवाजीराव बुचडे. सरचिटणीस, राष्ट्रीय तालीम संघ, पुणे.

Spread the love

६६ व्या महाराष्ट्र केसरी, पुणे शहर संघाची निवड चाचणी ; शिवाजीराव बुचडे. सरचिटणीस, राष्ट्रीय तालीम संघ, पुणे.

आवाज न्यूज : श्रेयश परदेशी पुणे प्रतिनिधी, २३ ऑक्टोबर.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने फुलगांव पुणे येथे होणाऱ्या ६६ व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब २०२३ या स्पर्धेसाठी पुणे शहर संघ निवड चाचणी कुस्ती स्पर्धा रविवार दिनांक २९ ऑक्टोंबर २०२३ रोजी रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे घेण्यात येणार आहे. सर्व कुस्तीगीर वस्ताद मंडळींना कळविण्यात येते की, आपण मोठ्या संख्येने सहभागी होवून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

माती विभाग महाराष्ट्र केसरी गट ५७ कि. ६१ कि. ६५ कि. ७० कि. ७४ कि. ७९ कि. ८६ कि. ९२ कि. ९७ कि. व ८६ ते १२५ कि. (महाराष्ट्र केसरी) गादी विभाग महाराष्ट्र केसरी गट : ५७ कि. ६१ कि. ६५ किं. ७० कि. ७४ कि. ७९ कि. ८६ कि. ९२ कि. ९७ कि. व ८६ ते १२५ कि. (महाराष्ट्र केसरी)

नियम व अटी : (१) स्पर्धेची वजने रविवारी दिनांक २९/१०/२०२३ रोजी सकाळी ९ ते १२ वा. पर्यंत छत्रपती

शिवाजी स्टेडीयम येथे घेण्यात येतील. २) स्पर्धेत सहभागी खेळाडूने तीन फोटो, आधार कार्ड झेरॉक्स प्रत व ओरीजनल प्रत सोबत घेवून यावी. 3) सदर स्पर्धेत पुणे शहर व जिल्ह्यातील स्थानिक खेळाडूंनाच सहभागी होता येईल. ४) स्पर्धेसाठी १ कि. ची सूट राहील. अशी माहिती शिवाजीराव बुचडे. सरचिटणीस, राष्ट्रीय तालीम संघ, पुणे यांनी आवाज न्यूजला दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!