आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

खंडाळा बोरघाटात रसायने वहातूक करणाऱ्या टेंपोला आगीमधे भस्मसात ..

टेंम्पोचालक व क्लीनर यांनी टेंपोला आग लागल्याने प्रसंगावधान राखून खाली उड्या मारल्या त्यामुळे त्यामधे जीवितहानी टळली.

Spread the love

खंडाळा बोरघाटात रसायने वहातूक करणाऱ्या टेंपोला आगीमधे भस्मसात ..

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.२ प्रतिनिधी.

खंडाळा बोरघाटात रसायने वहातूक करणाऱ्या टेंपोला आगीमधे भस्मसात झाला. यावेळी टेंम्पोचालक व क्लीनर यांनी टेंपोला आग लागल्याने प्रसंगावधान राखून खाली उड्या मारल्या त्यामुळे त्यामधे जीवितहानी टळली.माञ रसायने व टेम्पो चे लाखो रूपयांचे नुकसान झाले.

गुरूवारी मध्यरात्री बाराचे सुमारास भिवंडी ते हैद्राबाद आसा टेम्पो क्रमांक एम एच ४६,बी एम ००७७ हा खोपोली पोलिस स्टेशनचे हद्दीत खंडाळा बोरघाटात कि.क्र ४२ येथे आचानक आग लागून त्यातील केमिकलनेही पेट घेतल्याने मुंबई पुणे द्दुतगती मार्गावर पुणेकडे जाणाऱ्या लेनवर पेटून भस्मसात झाला.

बोरघाट पोलिस उपनिरिक्षक आनिल शिँदे यांचेतर्फे वाहतूक थांबवून खोपोली हून आगीचा बंब बोलावून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. द्रूतगतीमार्गावर आसलेली देवदूत य़ञणा , एम टी डी सी , पताळगंगा , उत्तम कंपनी , टाटा स्टील , एचपीसीएल आग विझविण्याचे युनिट ने आग विझविण्यात यश मिळविले.


खोपोली चे आग्निशमन अधिकारी हरी सूर्यवंशी , पेणचे दर्शन आहीर , खोपोली पोलिस स्टेशनचे पोलिसनिरिक्षक शिरिष पवार यांचेकडून यशस्वीपणे आग आटोक्यात आणल्याने त्यांचा या बाबत खालापूर चे तहसिलदार आयुब तांबोळी यांचेतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!