निधनवार्तामहाराष्ट्र

वैराग्यमुर्ती ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांचे दुःखद निधन.

वैराग्यमुर्ती ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांचे आज नवी मुंबई येथील नेरूळ येथे दुःखद निधन झाले.

Spread the love

वैराग्यमुर्ती ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांचे दुःखद निधन.वैराग्यमुर्ती ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांचे आज नवी मुंबई येथील नेरूळ येथे दुःखद निधन.झाले.

आवाज न्यूज :  मंच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २६ ऑक्टोबर.

वैराग्यमुर्ती ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांचे आज नवी मुंबई येथील नेरूळ येथे दुःखद निधन.झाले.
त्यांचे पश्चात कीर्तनकार ह.भ.प.भगवती महाराज दांडेकर (सातारकर ), ह.भ.प.चिन्मयमहाराज , पत्नी माईमहाराज सातारकर , नातवंडे , पतवंडे असा परिवार आहे.
वैकुंठवासी बाबामहाराज सातारकर यांचे पार्थिवावर ता.२७ रोजी नवीमुंबई येथे सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सातारकरांकडून कळविण्यात आले आहे.

मूळचे सातारा येथील बाबामहाराज वयाच्या १० व्या वर्षी मुंबई येथे आले. वैराग्यमुर्ती आप्पामहाराज व दादामहाराज यांचे सहवासात ते वारकरी सांप्रदायाचा कळस ठरले.
श्रीक्षेञ दुधिवरे येथे सुमारे चार कोटीचे दुमजली राजस्थानी लाल दगडात श्रीविठ्ठल रूक्मिणी व संत ज्ञानोबा व कळसावर तुकोबांची मुर्ती असे एकही खिळा, राॕड न वापरता कोरीव दगड सांधून मंदिर उभारले आहे.

श्रीक्षेञ पंढरपूर , श्रीक्षेञ आळंदी , तसेच श्रीक्षेञ दुधिवरे , तसेच नवी मुंबईतील नेरूळ येथे महाराजांचेवतीने मठ व मंदिरांचे बांधकाम केले असून दरवर्षी आषाढी व कार्तिकी वारीमधे बाबामहाराज सातारकर यांचे दिंडीचा सहभाग असतो.

ह.भप.वैआप्पामहाराज व वै.चैतन्य महाराज यांचेवर परमश्रध्दा असणारे बाबामहाराज यांची श्रीक्षेञ दुधिवरे व नेरूळ तसेच पंढरपूर येथे सप्ताहामधे कीर्तनसेवा तसेच श्रीमंत दगडुशेठ हलवाई यांचे ट्रस्टतर्फे श्रीगणेश कलाक्रीडा सभागृहात चातुर्मासात प्रवचनांचे कार्यक्रम चालत असत.

त्यांचे निधनाने वारकरी सांप्रदायातील एक तारा निखळला आहे ; अशी भावना वारकरी सांप्रदायाच्यावतीने व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!