आरोग्य व शिक्षण

विद्या प्रसारिणी सभेच्या विद्यालयात १७०५ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण

Spread the love

 लोणावळा : विद्या प्रसारिणी सभेच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे १३५० विद्यार्थी , विद्यार्थीनी व माध्यमिक विद्यालयात नववी व दहावीच्या ३५५ विद्यार्थ्यांचे लसीकरण काल व आज असे दोन दिवस सलग करण्यात आले.

पंधरा ते अठरा वर्षांच्या विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्याच्या शासकीय आदेशानुसार काल व आज लसीकरण केंद्रावर विद्या प्रसारिणी सभेचे प्राचार्य रामदास दरेकर , उपमुख्याध्यापक दादाभाऊ बी .कासार , पर्यवेक्षिका सौ.सुनिता ढिले, पर्यवेक्षक श्री.मानेसर, वरिष्ठ लिपिक भगवान आंबेकरसर तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी , तसेच डाॕक्टर गणेश भारती आणि त्यांचे परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी शाळा समितीचे सदस्य डाॕ.धिरूभाई टेलर(कल्याणजी ), लोणावळा येथील शंखेश्वर रूग्णलयाचे डाॕक्टर व परिचारिका यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी दोन रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परिचारिका शोभा कोंडावळे, सविता मुंडे , श्वेता कांबळे , गितांजली काळे, मंदाकिनी गायकवाड , साहील तांबोळी , नेहा पालकर, अक्षदा कदम, शाम वाल्मिकी , उत्तम ठाकर आदींनी लसीकरण केंद्रावर सहभाग घेवून विद्यार्थ्यांचे लसीकरण केले.

विद्या प्रसारिणी सभेचे शिक्षक श्री.दहीफळेसर, श्री.क्षिरसागर , श्री.ढाणेसर, श्री.सूर्यवंशी , श्रीमती चांदणी, श्री.खेडेकर , श्री.ढुमणे, श्रीमती तरन्मुम, १० वर्गशिक्षिका श्रीमती गायकवाड , श्री.काळे, श्री.सुरवसे, श्रीमती म्हस्के , श्रीमती एम.के.शिंदे , श्रीमती बॕले, श्रीमती भोसले, श्री.रसाळ , श्री.पिसे, श्री.देशपांडे , श्रीमती साळवेकर , श्रीमती शुक्ल, श्री.चोणगेसर, श्रीमती सिंग, श्रीमती खेंगरे, शिवाजी पाञा, श्री.शिंदे , रूपाली मोरे आदी उपस्थित होते.तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!