आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

राजमाता जिजाऊ साहेब या खरोखरच आई जगदंबेचा अवतार होत्या.

त्यांनी छञपती शिवरायांना जन्माला घालून हिंदवी स्वराज्य निर्माण केले : हभप. धर्मराज हांडे महाराज.

Spread the love

राजमाता जिजाऊ साहेब या खरोखरच आई जगदंबेचा अवतार होत्या.त्यांनी छञपती शिवरायांना जन्माला घालून हिंदवी स्वराज्य निर्माण केले : हभप. धर्मराज हांडे महाराज.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ३० ऑक्टोबर.

राजमाता जिजाऊ साहेब या खरोखरच आई जगदंबेचा अवतार होत्या.त्यांनी परकीय सत्ता असताना जवळ काहीच नसताना एक वीर पुञ जन्माला घातला, ज्याने मावळे जमा करून हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले.आणि रायगड किल्ल्यावर बत्तीस मण सुवर्णाचे सिंहासनावर छञपती म्हणून राज्याभिषेक करून घेत रयतेचे राज्य हिंदवी स्वराज्य निर्माण केले.अशा या माऊलीबद्दल बोलेल तितके कमी आहे, असे धर्मवीर धर्मराज हांडे महाराज यांनी उद्गार काढले.

तुंगार्लीतील ग्रामदेवता श्री जाखमाता देवी मंदिरात नवराञोत्सवानिमित्त ता.२३ धर्मराज महाराज हांडे यांचे कीर्तन सायंकाळी सहा ते आठ दरम्यान झाले , यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, जुन्नर येथे राजमाता जिजाऊ यांना सोडून सरदार शहाजीराजे परमुलूखात लढाईसाठी गेले, असता, त्यांचा बाप लखोजी जाधव यांनी काही हजार सैनिक घेवून शहाजीराजे यांना पकडून न्यायला जुन्नर गाठले.यावेळी विश्वासरावांचे वाड्यासमोर आई राजमाता जिजाऊ मासाहेब कडाडल्या, आजपासून लखोजी जाधव बाप म्हणून या जिजाऊ साठी मेला आणि आजपासून सिंदखेडराजा हे माहेरही संपले. मला तुमचे तोंडही पाहायचे नाही ! ! आसा करारी आवाजात बापाला इशारा करून त्या वाड्यात आल्या. खांबाला डोके आपटून ढसाढसा रडल्या. आशा या जिजाऊ मेणाहून मऊ आसणा-या वज्राहून कठीण झाल्या.बाप घोड्याला टाच मारून तिथून तडातडा निघून गेला.

प्रतापगडावर आफजलखानाचा वध केल्यावर त्याचे मुंडके तेथेच पायथ्याशी दफन करायला सांगून कबर बांधायला सांगितली.म्हणजे शञूचा मृत्यूनंतर आदरही करत दिवाबत्ती ची सोय केली. महाराज श्री हांडेमहाराज यांना साथसंगत ह.भ.प.केदारी महाराज व गायकांनी दिली.
नवराञोत्सवानिमित्त आई श्री जाखमाता देवीची मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली होती
रोज भजन कीर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी सात व राञी साडेसात वाजता आरतीचा कार्यक्रम होतो.

येथे श्री जाखमाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तोबा राणू मावकर , उपाध्यक्ष बबन विठ्ठल पवार , सचिव अनंता हरिभाऊ चिकणे आणि सह सचिव प्रदिप जाघक , खजिनदार अमित लोणकर , सहखजिनदार दशरथ इंगळे , आनंद जोशी , नारायण मावकर , दिपक मावकर , पप्पू देशमुख , सुभाष धनकवडे असे विश्वस्थ आहेत.
कीर्तनानंतर श्री जाखमाता देवी नवराञौत्सव मंडळांच्यावतीने अध्यक्ष दिपक मावकर यांनी व नवराञौत्सव मंडळांच्यावतीने कार्यक्रमात त्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, वारकरी व गायक ह.भ.प.अविनाशा महाराज केदारी, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मावकर, गणेश चव्हाण, राष्ट्रीय सायकलपटू आंबुरे व पिंगळे तात्या आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!