आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

चंद्र आहे साक्षीला…… …… श्री मधुसूदन ओझा यांच्या वाद्द्य वृंदाने प्रौढांनाही नृत्याचा ठेका धरायला लावला.

कोजागरी पौर्णिमेनिमित्त हिंदी मराठी नव्या जुन्या गीतांचा कार्यक्रम.

Spread the love

चंद्र आहे साक्षीला……
…… श्री मधुसूदन ओझा यांच्या वाद्द्य वृंदाने प्रौढांनाही नृत्याचा ठेका धरायला लावला.
कोजागरी पौर्णिमेनिमित्त हिंदी मराठी नव्या जुन्या गीतांचा कार्यक्रम.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३० ऑक्टोबर.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मावळ व सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानाने कोजागरी पौर्णिमेनिमित्त ‘चंद्र आहे साक्षीला’ हा हिंदी मराठी नव्या जुन्या गीतांचा कार्यक्रम वाचनालयाच्या प्रांगणात आयोजित केला होता.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्ती पूजनाने व आरतीने झाली त्यानंतर श्री मधुसूदन ओझा निर्मित मधुमित यांच्या वाद्य वृंदाने लोकप्रिय हिंदी व मराठी गीते सादर करून प्रेक्षकांना ठेका धरायला लावला.
रुक जा रात ठहर जारे चंदा…….,गली मे आज चांद निकला…,होशवालोंको खबर क्या बेखुदी क्या चीज है…., चंद्रा चित्रपटातील दिलखेचक लावणी……रोहित यांची ढोलकीची करामत….,चांदसी मेहबूबा….,रातका समा…., आधा है चंद्रमा रात आधी….अश्या एका पेक्षा एक सरस गीते सादर करून मधुसूदन ओझा, कल्याणी देशपांडे जोशी, गणेश मोरे या गायकांनी रंगत आणली तर नितीन खंडागळे (सिंथेसायझर.) मनिष सबनानी(ओक्टोपॅड व रिदम),रोहित साने (तबला, ढोलक,ढोलकी) यांच्या साथ संगतीने कार्यक्रमाची उंची वाढवली.

ओझा यांनी जेष्ठ नागरिकांना ए मेरी जोहराजबी तुझे मालूम नही…ह्या वक्त मधील कव्वालीवर जोडीने नाचायला लावून धम्माल उडवली..कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक मा.हरिश्चंद्र गडसिंग, मा. विलास काळोखे, मा.संग्राम जगताप व मा.नितीन शहा , मा कैलास केदारी व मा.निखिल भगत यांचा गौरव करण्यात आला. तसेच याप्रसंगी वाद्य वृंदातील सर्व सहभागी कलाकार व गायक यांचाही गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला.डॉ.अनंत परांजपे, पंडित सुरेश साखळकर, बबनराव भेगडे, नंदकुमार कोतुळकर , आवाज न्यूज चे संपादक गोपाळ परदेशी, रो दिलीप पारेख, रो संजय मेहता, रो भगवान शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नाट्य परिषदेचे व सेवाधाम ग्रंथालयाचे विद्यमान अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी प्रास्ताविक केले या प्रसंगी बर्लिन येथे झालेल्या विशेष मुलांच्यासाठी आयोजित क्रीडा स्पर्धेत भारताने दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल त्यांचा प्रशिक्षक म्हणून नुकताच महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेल्या नाट्य परिषदेच्या संचालिका सौ नयना डोळस यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला कार्यक्रमाचा समारोप मधुसूदन ओझा यांच्या लागा चुनरीमे दाग …..या गीताने झाला.

कोजागरी पौर्णिमेनिमित्त दुग्धपान ही आयोजित केले होते प्रेक्षकांनी कार्यक्रम बघताना मसाला दूध सेवन करत करत या कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाट्य परिषद व सेवाधाम ग्रंथालयाचे संचालक डॉक्टर मिलिंद निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन नाट्य परिषदेचे खजिनदार नितीन शहा यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाट्य परिषदेचे संचालक व सभासद हरिश्चंद्र गडसिंग, नितीन शहा, विलास काळोखे, प्रसाद मुंगी, संग्राम जगताप, तानाजी मराठे, कैलास केदारी, तेजस धोत्रे संजय भागवत, रतनसिंग रजपूत, चंद्रकांत ठक्कर तसेच ग्रंथालयाचे संचालक व सदस्य खजिनदार कैलास काळे, अमित बांदल, ग्रंथपाल बाळासाहेब घोजगे, निखिल भगत(उपाध्यक्ष सेवाधाम ग्रंथालय), शरद डावखर यांनी मोलाचे योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!