आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

वेद जाणण्या अगोदर वेदना जाणून घ्या..लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी..

Spread the love

वेद जाणण्या अगोदर वेदना जाणून घ्या.. लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, ३० जानेवारी.

–मित्रांनो आपल्याला अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या वेदना दिसतात कधी त्या कोणाकडून ऐकायला मिळतात कधी कुणाला काही सांगतांना जाणवतात तर कधी वाचतांना किंवा त्या लिहिताना देखील अशा वेदना समजतात काही वेदना या स्वतःच्या देखील असू शकतात तर कधी दुसऱ्यांच्या ही जीवन प्रवासात आढळतात वेदना पण यात एक मात्र निश्चित असतं की या सगळ्या वेदना आपली एकाअर्थी परीक्षाच घेत असतात. म्हणजे जर आपल्याला स्वतःची वेदना जाणवली तर आपण जिवंत आहोत हे कळत आणि जर दुसऱ्याची वेदना आपल्याला जाणवली तर आपल्यातली माणुसकी जिवंत आहे, हे निश्चितच सगळ्यांना लक्षात येतं थोडक्यात आपल्यातली संवेदना जेव्हा जागृत होते इथूनच प्रत्यक्ष त्याला मदत करण्याची त्याच्या संकटातून संघर्षातून त्याला बाहेर काढण्याची कृती ही आपल्या हातून घडते आणि ती त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते आणि त्या मुळेच आपल्याला माणुसकी दाखवण्याची संधी प्राप्त होते.

हा आलेला अनुभव आपल्या आयुष्यामध्ये निश्चित एक वेगळा आनंद देऊन जातो जो शब्दात अथवा पैशात कधीच मोजता येत नाही, यातूनच अनेक संस्थांचा जन्म होतो आणि त्या निरंतर कार्यरत राहतात आणि याच विचारातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘लायन्स आणि रोटरी” या दोन्ही संस्थांची निर्मिती झाली या बाबतीत लायन अंतरराष्ट्रीय संस्थेच एक उदाहरण द्यायचं म्हणजे त्यांनी ,अंधत्व दूर करणे हा मुख्य प्रकल्प देशपातळीवर हाती घेतला आणि तो पूर्ण केला. तसेच रोटरी या आंतरराष्ट्रीय संघटनेने ,पोलिओमुक्त भारत हा प्रकल्प यशस्वी केला यावरून मित्रांनो आपलं असं लक्षात येईल की मी एकटा जे काम करू शकत नाही तर दहा लोकांना घेऊन मला हत्तीच बळ प्राप्त होतं आणि त्यामुळे अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. म्हणूनच मित्रांनो इंग्रजीत असे म्हटले जातं की “टू कम टुगेदर इज बिगिनिंग टू कीप टुगेदर इज प्रोग्रेस अंड टू वर्क टुगेदर इज सक्सेस” याचा मराठीत मतितार्थ असा कि एकत्र येण ही सुरुवात असते एकत्र राहणे ही प्रगती असते आणि एकत्र काम करणं ही यशाची पहिली पायरी ठरते या सर्वांचा मूळ उद्देश एकच असतो की जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरु. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!