ताज्या घडामोडी

सांगली जिल्ह्यातील धनगर समाजाच्या सर्व सरपंच व सदस्यांच्या सत्काराचे ४ फेब्रुवारी रोजी आष्टा येथे आयोजन-सांगली जिल्हाध्यक्ष मा. श्री. संजयदादा पाटील

Spread the love

सांगली जिल्हा धनगर समाज महासंघाच्या वतीने धनगर समाजाच्या सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार शनिवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी आष्टा, ता. वाळवा येथील मा. श्री. आण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल येथे सकाळी ठिक १२:०० आयोजित करण्यात आला असल्याची माहिती धनगर समाज महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. संजयदादा पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक मार्गदर्शक व महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा. श्री. आण्णासाहेब डांगे (आप्पा) व धनगर समाजाचे राज्याचे नेते माजी आमदार मा. अँड. रामहरी रूपनवर यांच्या शुभ हस्ते सर्व नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असुन या समारंभास महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे, मल्हार सेनेचे सरसेनापती मा. श्री. बबनराव रानगे, महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतीक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रा. अरुण घोडके, अहिल्या महिला संघाच्या सांगली जिल्हाध्यक्षा मा. सौ. सविताताई मदने, मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. शंकरराव वगरे, कर्मचारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. जनगन्नाथ कोळपे, सांस्कृतीक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सर्जेराव टकले माजी जिल्हापरिषद सदस्य संभाजीराव कचरे यांच्या सह सांगली जिल्ह्यातील धनगर समाजाचे सर्व आजी माजी सभापती, महापालिकेचे महापौर, नगरसेवक, नगरपालिकांचे नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य व महासंघाचे पदाधिकारी, समाज बांधव, महिला उपस्थित राहणार आहेत.

सत्कार समारंभ यशस्वितेसाठी शिराळा तालुक्यातुन श्री. शिवाजीराव यमगर, भिमराव ताटे, वाळवा तालुक्यातुन धनगर समाज महासंघाचे तालुका अध्यक्ष अविनाश खरात, सुनिल मलगुंडे, विकास नांगरे, शिवाजी डांगे, उमेश गावडे, प्रकाश कनप, किसन गावडे, सांगली मिरज तालुक्यातुन नगरसेवक श्री. विष्णू माने, बाळासाहेब फौंडे, प्रकाश ढंग, कवठेमहांकाळ मधुन प्रकाश ऐडगे, अशोकराव ऐडगे, जत तालुक्यातुन श्री. शंकरराव वगरे, माणिकराव वाघमोडे, श्री. आकाराम मासाळ, आटपाडी तालुक्यातुन प्रा. रामचंद्र चोपडे, विलासराव काळेबाग, प्रमोद धायगुडे, तासगांव मधुन श्री. संजयदादा पाटील, रामभाऊ थोरात, विवेक शेंडगे, बाळासाहेब ऐडके, प्रभाकर पाटील, विकास मस्के, अँड. विनाकराव पाटील, खानापूर तालुक्यातुन माजी जिल्हापरिषद सदस्य श्री. किसनराव जानकर, सुरेश मेटकरी, पलुस व कडेगांव मधुन माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. कुंडलिक ऐडके (नाना), सौ. शोभाताई होनमाने, संदीप सिसाळ आदी समाजाचे पदाधिकारी प्रयत्नशिल असुन सांगली जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन सांगली जिल्हा धनगर समाज महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष मा. श्री. संजयदादा पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!