ताज्या घडामोडी

वाळवा पंचायत समिती इस्लामपूर यांच्या वतीने रेठरे धरण येथे एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
वाळवा पंचायत समिती इस्लामपूर यांच्यावतीने शाश्वत व सर्वांगीण ग्रामविकासासाठी नूतन लोकनियुक्त सरपंच व उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी वाळवा पंचायत समिती सर्व खाते प्रमुख, क्षेत्रीय अधिकारी यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटक व अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. जयंतरावजी पाटील साहेब व शिराळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. मानसिंगराव नाईक (भाऊ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी वाळवा तालुक्यातील सर्वांत जास्त रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत तालुकास्तरीय 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेबद्दल रेठरे धरण ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले त्याचे प्रशस्तीपत्र व शिल्ड मा.आ. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते रेठरे धरण गावचे लोकप्रिय युवा लोकनियुक्त सरपंच मा. हर्षवर्धन पाटील (बाबा) व ग्रामविकास अधिकारी विष्णू गुरव अण्णासाहेब उपसरपंच शंकर पवार यांनी स्वीकारले तसेच रमाई आवास योजना अंतर्गत तालुकास्तरीय उत्कृष्ट लाभार्थी पुरस्कार प्रथम क्रमांकाचे बक्षीस रेठरे धरण गावचे मा.श्री. कुमार निवृत्ती कांबळे यांनी पटकावला. याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, सहा.गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, माजी सभापती शुभांगी पाटील सर्व गावचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!