ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता खेळामध्येही यशस्वी व्हावे :आ.मानसिंगराव नाईक

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच खेळामध्येही यशस्वी व्हावे असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्य बैंकेचे अध्यक्ष मा आ मानसिंगराव नाईक यांनी केले ते पुनवत येथील हिंदकेसरी पै गणपतराव आंदळकर विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी आ नाईक म्हणाले, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच विविध खेळामध्ये सहभागी व्हावे व एक आदर्श व परिपूर्ण खेळाडू म्हणून नाव कमवावे.
प्रमुख वक्ते प्रा प्रकाश नाईक म्हणाले,शिक्षण हे माणसामध्ये,समाजामध्ये परिवर्तन घडवून आणते . विद्यार्थ्यांनी शिक्षणाशी जोडलेली नाळ पुस्तकाशी जोडलेले नाते कधीही तोडू नये विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता यशाकडे जाण्याचा मार्ग शोधावा कहा सल्लाही त्यांनी दिला.
तहसिलदार गणेश शिंदे म्हणाले विद्यार्थ्यांनी आई-वडिल व गुरुजनाकडून प्रेरणा घेऊन एक सुजान नागरिक बनाने,आई वडालांचे नाव मोठे करावे.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.दहावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी श्रध्दा गायकवाड,पायल गायकवाड,सानिका पाटील यांना शिल्ड व रोख रक्कमेचे बक्षिस देऊन गौरवण्यात आले.तसेच हर्षवर्धन आंबरे,सिध्देश पाटील,श्रावणी पाटील यांचाही उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला.नवोदय विद्यालयासाठी निवड झालेबद्दल आदर्श पाटील यांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर गणित दिना निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व हळदी-कुंकु कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी महिलांनाही बक्षिस देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक आनंदा पाटील यांनी केले.अहवालवाचन रेखा जाधव यांनी केले,पाहुण्यांची ओळख सुनिल सकटे यांनी केली.यावेळी मुख्याध्यापक श्री अशोक पाटील,संस्थेचे सचिव पै दत्ताजीराव आंदळकर,उपसरपंच गणपती शेळके,सेवा सोसायटी चे अध्यक्ष रघुनाथ आंदळकर,भिमराव पाटील, अमरसिंह आंदळकर,अशोक खोत,किसन मोरे,दिलिप शेळके,बाबासो आंदळकर,पोलिस पाटील बाबासो वरेकर ,चेतन आंदळकर ,वैभव जाधव, परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध शाळांचे प्रतिनिधि,पालक,माजी विद्यार्थी, विद्यालयाचे, सर्व शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.सुत्र संचालन पांडुरंग खवरे यांनी केले शेवटी मनिषा पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!