आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

कामशेत, मावळातील ग्रामीण भागात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात

Spread the love

कामशेत :- मावळातील ग्रामीण भागात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात

आवाज न्यूज प्रतिनिधी   शिवानंद कांंबळे, आमावस्या  ,पौर्णिमा किंवा सूर्य-चंद्र ग्रहणाच्या रात्रीच्या सुमारास जादूटोणा, मंत्रतंत्र, प्रक्रिया अश्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटना घडत असतात,अशा घटना मावळ तालुक्यात असे प्रकार मोठ्या संख्येने घडत आहेत.रस्त्यावर, घराबाहेर, शेतामध्ये जादूटोण्याचे प्रकार घडत आहेत. नाणे मावळात अथवा ग्रामीण भागात अंधश्रद्धा अध्याप कमी होताना दिसत नाही. असाच अंधश्रद्धेचा प्रकार (दि.२७) रोजी नाणे परिसरात कामशेत – जांभवली

रस्त्याला लागुन असलेल्या नाणे येथील वेसर कंपनी जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने राञी- अपराञी येऊन लिंबू, मिरच्या, टाचण्या, पुऱ्या, अंडी, कुंकू, कोहळ, गुलाल, बाहुली, नारळ ठेवलं असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे आजुबाजुच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी.
रात्रीच्या सुमारास अश्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटना आहेत.काही ग्रामस्थांना अनेक ठिकाणी घरासमोर काही मिरच्या, लिंबू, नारळ असल्याचे समोर आले असून हा संपूर्ण प्रकार अंधश्रद्धा पसरवणारा असून याची पोलीस, प्रशासनाने तसेच अंधश्रद्दा निर्मूलन समितीने याबाबत चौकशी करावी.असे प्रकार करण्यावर व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!