ताज्या घडामोडी

नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी पुणे आणि कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य सन्मान व कविता अभिवादन सोहळा २०२३

Spread the love

या साहित्य विषयक विविध पुरस्काराचे वितरण आज रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे करण्यात आले.
*केशवसुतांचे वारसदार कवी* हा सन्मान *अ.भा. मराठी साहित्य संमेलन पिंपरीचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस* यांच्या शुभहस्ते *कोमसाप युवाशक्ती जिल्हाध्यक्ष आणि कविवर्य *अरुण मोर्ये.* यांना प्रदान करण्यात आला.
तसेच *कोमसाप शाखा मालगुंड युवाशक्तीप्रमुख, कविवर्य अमेय धोपटकर यांना देखील केशवसुतांचे वारसदार कवी* हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी साहित्यपीठावर *कवि केशवसुत स्मारक समिती अध्यक्ष गजानन तथा आबासाहेब पाटील, कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, जेष्ठ कामगार नेते, लेखक अरूण गराडे, जेष्ठ साहित्यिक उध्दव कानडे, कामगारभूषण राजेंद्र वाघ* हे मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यातील कविसंमेलनात महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या निमंत्रित व पुरस्कार प्राप्त कवींनी आपल्या कवितेतून केशवसुताना अभिवादन करतानाच श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!