ताज्या घडामोडी

मेगाब्लाॕकमुळे शनिवारी सायंकाळी ते रविवारी राञीच्या रेल्वेच्या लांब पल्याच्या गाड्या व लोकलसेवा रद्द.

शनिवारी ता.२५ सायंकाळी सहा ते रविवारी ता.२६ राञी साडेआठ दरम्यान मुंबई पुणे मार्गावर मेगाब्लाॕकमुळे सर्व लोकलसेवा व एक्स्पेस गाड्या रद्द ..

Spread the love

मेगाब्लाॕकमुळे शनिवारी सायंकाळी ते रविवारी राञीच्या रेल्वेच्या लांब पल्याच्या गाड्या व लोकलसेवा रद्द ; शनिवारी ता.२५ सायंकाळी सहा ते रविवारी ता.२६ राञी साडेआठ दरम्यान मुंबई पुणे मार्गावर मेगाब्लाॕकमुळे सर्व लोकलसेवा व एक्स्पेस गाड्या रद्द ..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २४: नोव्हेंबर.

ता.२५ सायंकाळी सहा ते ता.२६ राञी साडेआठ दरम्यान मुंबई पुणे मार्गावर मेगाब्लाॕकमुळे सर्व लोकलसेवा व एक्स्पेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.पुणे, शिवाजीनगर येथे याबाबत रेल्वेकडून प्रसिध्द पञक चिटकवले या रेल्वेसेवा रद्दमुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

ता.२५ रोजी मुंबई पुणे सिंहगड एक्स्पेस रद्द करण्यात येणार आहे.ता.२६ रोजी पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेस , डेक्कन क्विन , इंटरसिटी , मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस , पुणे मुंबई व मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस , मुंबई कोल्हापूर व कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्स्पेस रद्द करण्यात आली आहे.

 

 

शनिवारी ता.२५ सायंकाळी सहा ते रविवारी राञी साडेआठ असा सुमारे सव्वीस तासांचा मेगाब्लाॕकमुळे रेल्वे प्रवाशांना पीसीएमटी , खाजगी प्रवाशी गाड्या यांचा आधार घ्यावा लागणार आहे.

पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेस , उद्यान एक्सप्रेस , पुणे जयपूर एक्सप्रेस, दौंड इंदापूर, ञिवेंद्रम ते मुंबई या गाड्रा रद्द केलेल्या आहेत, याची रेल्वे प्रवाशांनी नोंद घ्यावी , असे मध्यरेल्वेकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!