ताज्या घडामोडी

शिक्षण खाते ढवळून काढणाऱ्या अनेक बातम्या श्री डिसले सर रजा प्रकरणातून अनेक प्रश्न उपस्थित

Spread the love

प्रकरणात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे श्री डिसले सरांनी देऊन चर्चा थांबवावी असे वाटते.प्रश्नांची उत्तरे न दिल्यास प्रकरणाबद्दल शिक्षणावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या मनात अनेक शंका उपस्थित होतील.ज्या भविष्यासाठी वाईट असणार आहेत.
पुढील प्रश्नांची उत्तरे सर्व चांगल्या -वाईट चर्चा थांबवू शकतात.
(१) *श्री डिसले सर २०१७ पासून कुठे काम करत होते?*
(२) *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) येथे कार्यरत होते तर श्री डिसले सर यांनी तेथे कोणते काम केले?*
(३) *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) सोलापूर येथे श्री डिसले सर हे संस्थेत हजर नव्हते म्हणतात यावर श्री डिसले सरांचे म्हणणे काय आहे?*
(४) *महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, ( MSCERT) पुणे ही प्रशिक्षण देणारी राज्यातील शिखर संस्था आहे. त्यांच्याकडून श्री डिसले सरांना प्रशिक्षणाबद्दल कोणते आदेश दिले होते ते कृपया दाखविले तर सर्व प्रश्न सुटतील.*
(५) *MSCERT यांनी प्रशिक्षण घेण्यासाठी आदेश दिले नसल्यास मग प्रशिक्षण घेण्यासाठी कोणी आदेश दिले हे स्पष्ट व्हायला हवे*
(६) *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) सोलापूर वा MSCERT ,पुणे यांचेकडे श्री डिसले सर हजर नव्हते वा या दोन्ही संस्थांनी प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले नव्हते तर मग कोणाच्या आदेशाने श्री डिसले सर यांनी शिक्षकांना व मुलांना प्रशिक्षण दिले आहे?*
(७) *श्री डिसले सर यांना ग्लोबल टीचर ॲवॉर्ड मिळाल्याची बक्षीस रक्कम इन्कमटॅक्स फॉर्म भरताना दाखविली आहे का? हे दाखविणे जिल्हा परिषदेचा कर्मचारी म्हणून बंधनकारक आहे.*
(८) *रजा मागणी अर्ज करताना नियमानुसार केला नसल्यास मान्यता देताना अडचणी येऊ शकतात.कारण नियम सोडून‌ रजा मंजूर केली तर अडचणी येवू शकतात.*
(९) *श्री डिसले सर यांनी २०१७ नंतर कोणत्या आस्थापनेवरुन पगार घेतला आहे*
(१०) *आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिळालेल्या पुरस्काराबाबतची माहिती , कागदपत्रे जिल्हा परिषद वा शिक्षण विभाग यांचेकडे सादर केली आहेत का? असल्यास केंव्हा ?ती कागदपत्रे आपण समाजासमोर देणार का?*
*मा श्री डिसले सरांनी त्यांचे बाबत प्रशासनाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची उत्तरे पुराव्यानिशी दिल्यास सर्व चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.*
(११) *श्री डिसले सर कोणालाही उत्तरे देत नाहीत. बोलावले तर उपस्थित राहत नाहीत. प्रशासनाने बोलावले तर उपस्थित राहावे लागेल. कोणी अपमान केला आहे वा पैसे मागितले असतील तर माहिती द्यावी अन्यथा केवळ पोकळ आरोप होतील.मा मुकाअ यांनी लेखी विचारणा करुन अन्याय कोणी केला याबाबत लेखी विचारणा केली आहे.समाज मागे असल्याने डिसले सरांनी आपले म्हणनं द्यायला हवे. आपण रडल्यामुळे सहानुभूती मिळेल पण न्याय मिळवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतील.अन्यत: लोक दोन्ही बाजूंनी चर्चा करतील*
*प्रशासनाला विनाकारण त्रास देता येणार नाही ,पण माहिती मागण्याचा अधिकार नक्कीच आहे.शिअ ऐकत नसतील तर मा मुकाअ ,तेही ऐकत नसतील तर मा आयुक्त वा मा सचिव शिक्षण विभाग यांच्या कडे दाद मागता नक्कीच येते.चांगले , चाकोरीबाहेर जाऊन काम करणारे,समयदान करणारे व पदरमोड करून मुलांसाठी सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या प्रशासन,पालक व समाज नेहमीच ऋणात राहणे पसंत करत असतो*
*श्री डिसले सर तुम्ही विद्वान आहात, हुशार आहात त्यामुळे प्रशासनाच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांची तोंड बंद करावित असे वाटते.जर आपण असं केलं‌ नाहीत तर लोकांना अनेक शंका येतील.आपले चारित्र्य,आपले काम,आपली सचोटी याबाबत कोणी शंका घेवू नये असं वाटत असेल तर व्यक्त होणे आवश्यक आहे*

*प्रशासनानेही पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत.–*
(१) *श्री डिसले सर २०१७ पासून जिल्हा परिषदेच्या शाळेत वा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर येथे उपस्थित नसतील तर त्यांचा पगार का दिला??*
(२) *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर येथे श्री डिसले सर हजर नाहीत तर प्राचार्यांनी किती वेळा व कोणाकोणाकडे गैरहजर रिपोर्ट केले?*
*मा मुकाअ,मा शिक्षणाधिकारी व मा शिक्षण सचिव यांना श्री डिसले सर यांच्या गैरहजेरी बाबत कळविले का?कळविले असल्यास किती वेळा? वरिष्ठ अधिकारी यांना समक्ष भेटून ही गंभीर बाब का सांगितली नाही ??*
(३) *श्री डिसले सरयांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची पर्यायी व्यवस्था गटशिक्षणाधिकारी वा शिक्षणाधिकारी यांनी काय केली? केली नसल्यास जबाबदारी कोणाची होती*
(४) *श्री डिसले सर यांचा २०१७-१८,१८-१९,१९-२० व २०२०-२१ चा गोपनीय अहवाल कोणी लिहिला आहे? गोपनीय अहवाल कोणीच लिहिला नसल्यास याला जबाबदार कोण ? गोपनीय अहवाल लिहिला गेला असल्यास तो कोणत्या कामावर लिहिता गेला आहे? श्री डिसले सर यांचा गोपनीय अहवाल पाहिल्यावर त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती मिळेल.*
(५) *श्री डिसले सरांनी २०१७ पासून रजा किरकोळ वा दीर्घ मुदतीच्या रजा कोणाकडून मंजूर करून घेतल्या?कोणी मंजूर केल्या*?
*प्रशासनाने व श्री डिसले सर यांनी मिडियात होत असलेल्या चर्चा थांबायच्या असतील तर स्वतः पुढे येऊन आपली माहिती पुराव्यानिशी सादर करुन सर्वांची तोंडे बंद करायला हवीत.*
*श्री डिसले सर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेले यश व बक्षीस पाहता आनंदाने मन भरून येते.देशासाठी ही बाब गौरवास्पद व कौतुकास्पद आहे.म्हणूनच हिमालयाची उंची गाठलेल्या शिक्षकाबाबत उलट-सुलट चर्चा होणं थांबवायचे श्री डिसले सरांच्या हातात आहे.त्यांनी उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत व लागलेलं ग्रहण दूर करावे असे वाटते.*
*शिक्षक कितीही मोठा झाला तरी प्रशासनाच्या चाकोरीतून जावे लागले. महाराष्ट्रात अनेक प्राथमिक शिक्षक PhD झालेले व उच्च विद्याविभूषित आहेत.पदवी बद्दल , सेवेबद्दल तक्रारी होऊन आठवडाभर चर्चा वा वाद मात्र फारसे झाले नाहीत.*
*श्री वारे सर व श्री डिसले सर दोन्ही संदर्भ वेगवेगळे आहेत.श्री वारे सर प्रत्यक्ष शाळेत हजर होते,शाळा गुणवत्तापूर्ण केली,शाळेचा पट. प्रचंड वाढविला व भौतिक सुविधा न भूतो न भविष्यती केल्या आहेत.श्री वारे सर रजा न घेता जीव ओतून शाळेसाठी सेवा देणारा माणूस आहे.म्हणूनच श्री वारे सर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने दिल्याशिवाय समाजाच्या मनातील शंका दूर होणार नाहीत.*
*श्री डिसले सर व श्री वारे सर यांनी आपलं म्हणणं व उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे पुराव्यानिशी सादर केली व प्रशासनाने आपली मतं व संबंधित शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुराव्यानिशी दिली तर दूध का दूध और पानी का पानी होईल व शिक्षण विभागावर आलेली शंकेची धुळ झटकली जाऊन नव्याने शिक्षण विभाग उजळून जाईल असे मनापासून वाटते.*
संपत गायकवाड ( माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!