ताज्या घडामोडी

डाॅक्टर सौ. मायाताई कुलकर्णी, फेस्काम महिला भुषण पुरस्काराने सन्मानित

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

सर्व महिलां भगिनी सह सर्व ज्येष्ठ नागरिकांना भूषण वाटणारे नांव…ज्यांच्या नांवातच माया आहे अश्या मायाळू स्वभावाच्या डाॅ, मायाताई कुलकर्णी यांना आज फेस्काॅम महिला भूषण पुरस्काराने गौरवण्यात येत आहे…पेशाने डाॅक्टर असलेल्या, कुशाग्र बुद्धिच्या ,लातूर निवासी मायाताईंनी तत्कालीन मॅट्रिक परीक्षेत मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळवून सत्कारार्थी झाल्या, तेव्हा त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिची चमक तर दाखवलीच, इतकेच नव्हे तर, मराठवाडा युनिव्हर्सिटीत, सरकारी मेडिकल कॉलेज मध्ये, संपूर्ण शिक्षण घेतांना त्या स्काॅलरशिप च्या मानकरी होत्या..
*MBBS वैद्यकीय पदवीधर होताच, नियमानुसार सरकारी हाॅस्पीटल मध्ये त्यांनी सेवा रुजू केली. .त्याच वेळी आपले खाजगी ६०/खाटांचे भव्य ममता हाॅस्पीटल ची स्थापना करुन, वैद्यकीय व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली…

सेवा परमो धर्म , या उदार वृत्ती च्या मायाताईंनी अनेक वृद्धाश्रम, अनाथाश्रमांना भरघोस आर्थिक मदत केली, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे १२ वर्ष अध्यक्षपदी विराजमान झालेल्या मायाताईं आज महराष्ट्र महिला समिती च्या अध्यक्षा आहेत,
*त्यांच्या सेवाभावी वृत्ती ने २०१० ला जीवनगौरव पुरस्कार, व २०१५ला सेवाभावी संस्थेच्या स्पंदन पुरस्काराच्या सन्मानित मानकरी झाल्या…
*लिखाणाच्या जोपासलेल्या आवडीने, त्यांनी “स्नेहबंधाच्या पाऊलखुवा” या पुस्तकाच्या प्रकाशनासमवेत कॅन्सर विषयी जनजागृती व्हावी म्हणून अनेक वैद्यकीय पुस्तके लिहिली, रोटरी क्लब लातूर चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले,
*अश्या बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या आपल्या मायाताईंना आज फेस्काॅम च्या महिला भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे,
*खरे म्हटले तर हा पुरस्काराचाही गौरव आहे, अनेक पदे, अनेक पुरस्कार प्राप्त मायाताईंच्या पुरस्काराला आपलाही सन्मान झाल्या चा आनंद झाला असेल…
*काही व्यक्तीमत्व हे निश्चित च पुरस्कारा पेक्षा श्रेष्ठ असतात आपल्या मायाताईं हे व्यक्तीमत्व अगदी तसेच आहे…अमळनेर पुज्य सानेगुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील ,सचिव एस एम पाटील, व सर्व कार्यकारणी सदस्य यानी डॉ मायताईंचे हार्दिक अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!