ताज्या घडामोडी

दालमिया भारत शुगर युनिट व दालमिया फौंडेशनचे काम कौतुकास्पद आहे: मेघा लोहार

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी शिकावा यासाठी दालमिया भारत शुगर युनिट व दालमिया फौंडेशन त्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहे.हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन शिक्षिका मेघा लोहार यांनी केले.त्या दुरंदेवाडी ता.शिराळा येथे दालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवी करुंगली व दालमिया भारत फौंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होत्या.यावेळी कोकरुड प्राथमिक आरोग्य केंद्राचे ही.एच‌.ओ. आर.के.कु़ंभार, कुसाईवाडीच्या उपसरपंच कोमल पन्हाळकर,यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना लोहार पुढे म्हणाल्या की, डोंगर दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी शिकावा .तो गुणवत्ता पुर्वक व्हावा हा उद्देशाने दालमिया भारत फौंडेशन विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे.हे सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी आहे. दालमिया फौंडेशनचे ही.एस.आर सुनिल कांबळे म्हणाले की, फौंडेशनच्या माध्यमातून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, महीला बचत गट, नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या कुटुंबांना मदत करण्याचे काम सातत्याने करीत आहे. या कार्यक्रमास सी.एस.आर . सुनिल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव खोत, आरोग्य सेविक आय.पी.सनगर, सुनिल पन्हाळकर, संतोष परिट आदींसह उपस्थित होते.
फोटो ओळी: विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी उपसरपंच कोमल पन्हाळकर,आर.के.कुंभार, बाजीराव खोत व अण्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!