राजकीय
पृथ्वीराज चव्हाणांच्या कुंभारगावमधील सोसायटीत प्रथमच आघाडीची सत्ता
पाटण – राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाटण तालुक्यातील कुंभारगावमधील विविध कार्यकरी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदाच बनवलेल्या महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनेलने सर्व १३ जागा जिंकत विरोधी रयत विकास आघाडीचा दारुण पराभव केला.
राज्याचे गृहमंत्री शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारगावचे सोसायटीचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण ,माजी जि.प सभापती जि.प संजय देसाई आणि उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने आपले शेतकरी विकास पॅनेल उभे केले होते.या निवडणुकीत या पॅनेलचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.