आरोग्य व शिक्षण

संताजी सेवा प्रतिष्ठान रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

चिंचवड  : येथील संताजी सेवा प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड, कम्युनिटी डॉक्टर – कम्युनिटी कार्यकर्ता आणि मोरया पॅरामेडिकल इंस्टिट्यूट (चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान शिबीर यशस्वी केले.

रक्तदान शिबिराचे उदघाटन चिंचवड पोलीस स्टेशनचे पी.आय.  खुळे साहेब, पत्रकार अविनाश चिलेकर, संताजी सेवा प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष पी.टी.चौधरी, नरेंद्र मेहर, कम्युनिटी डॉक्टर-कम्युनिटी कार्यकर्ता संस्थापक अध्यक्ष व मोरया पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट संस्थापक गणेश अंबिके, औंध रुग्णालय रक्तपेढी प्रमुख डॉ.निशा तेली, गोविंद चौधरी, प्रदीपभाऊ सायकर आदींचे हस्ते दीपप्रज्वलन तसेच संताजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी संताजी सेवा प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष पी.टी.चौधरी, गोविंद चौधरी, प्रदीपभाऊ सायकर, राजाराम वंजारी, राजेंद्र चौधरी, सचिन काळे, सुनील देशमाने, अमोल देशमाने, भरत चौधरी, ज्योती तेली, लता डोंगरे, सुभाष चौधरी, दिलीप चौधरी व संताजी सेवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, तसेच कम्युनिटी डॉक्टर- कम्युनिटी कार्यकर्ता या संस्थेचे कार्याध्यक्ष वीरेशजी छाजेड, सचिव धनवंत धिवर, CDCV टास्क फोर्स अध्यक्ष नितीन सोनवणे, डॉ.सौ.सरोज अंबिके, रतिका शर्मा, हेमराज थवानी, भाजप ओबीसी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राजेशजी डोंगरे, आळंदी नगरपरिषद जैव वैद्यकीय समितीचे सदस्य डॉ. प्रीतम किरवे, विशालजी गुरव, नितीन साळी, अनिल झोपे, फिजिओथेरपिस्ट धनश्री भुजबळ, CDCV विद्यार्थी अध्यक्ष सागर पुंडे, सविता धुमाळ, अश्विनी पोळ, रवी कबाडे, हनुमान खटिंग, वर्षा खटिंग, प्रसाद बवले, उर्मिला जगताप, धनश्री जाधव, किरण शिनगारे, तेजस शिनगारे, श्रेयश खर्गे पदाधिकारी उपस्थित होते.

रक्तदान शिबीरास उपस्थित मान्यवरांचा श्री.संताजी सेवा प्रतिष्ठान यांच्याद्वारे श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. चिंचवड पोलीस स्टेशनचे पी.आय. खुळे साहेब यांनी रक्तदान शिबिरास शुभेच्छा दिल्या, तसेच भविष्यामध्ये अधिकाधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे असे आवाहन त्यांनी केले. रक्तदान शिबिरास कम्युनिटी डॉक्टर-कम्युनिटी कार्यकर्ता उपाध्यक्ष डॉ.आशिष चौहान, श्रीयस रायचूरकर, धनंजय जगताप, ओंकार हेरलेकर यांचे मार्गदर्शन झाले. रक्तदान शिबिरामध्ये चाळीसवर रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्त संकलन औंध रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने करण्यात आले. याप्रसंगी रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कम्युनिटी डॉक्टर- कम्युनिस्ट कार्यकर्ता अध्यक्ष डॉ.श्री.गणेश अंबिके सर यांनी कम्युनिटी डॉक्टर-कम्युनिटी कार्यकर्ता या संस्थेमार्फत भविष्यामध्ये अनेक रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येतील तसेच अनेक आरोग्य उपक्रम संस्थेच्या मार्फत पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राबवण्यात येतील असा संकल्प या ठिकाणी व्यक्त केला.

औंध रुग्णालय रक्तपेढी प्रमुख डॉ.निशा तेली यांनी सर्व रक्तदात्यांचे तसेच या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन नितीन साळी यांनी केले. आभार CDCV संस्थेचे कार्याध्यक्ष वीरेश छाजेड यांनी मानले. रक्तदान शिबिर कोरोनाच्या सर्व शासकीय नियमांचे पालन करुन उत्साहात पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!