आपला जिल्हामहाराष्ट्रमावळराजकीय

सोमाटणे फाटा येथे मा.राज्यमंत्री.बाळाभाऊ भेगडे व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष. बापुसाहेब भेगडे यांच्या मध्ये महत्वाच्या विषयावर दिर्घकाळ चर्चा .

Spread the love

सोमाटणे फाटा येथे मा.राज्यमंत्री.बाळाभाऊ भेगडे व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष. बापुसाहेब भेगडे यांच्या मध्ये महत्वाच्या विषयावर दिर्घकाळ चर्चा.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २८ डिसेंबर.

सोमाटणे फाटा येथे मा.राज्यमंत्री.बाळाभाऊ भेगडे व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष. बापुसाहेब भेगडे यांच्या मध्ये महत्वाच्या विषयावर दिर्घकाळ चर्चा झाली चर्चेत मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोगर तसेच तालुक्यातील जिथे जिथे देवस्थान मंदिर असतील त्याठिकाणी रस्ते, लाईट,पाणी ह्या सर्व सुविधा होणे गरजेचे आहे.

आपण जर तिनही पक्ष मिळुन सत्तेत असेल तर आपण एकत्र विकास करण्यासाठी येणे गरजेचे आहे, त्यामधे आमचे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत शिवाय बाळाभाऊचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत.

प्रामुख्याने मावळ तालुक्यात डॅा.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या जिथे जिथे श्री समर्थ बैठक आहे काही ठिकाणी संध्याकाळी बैठक असते बैठक संपल्यावर रात्री अंधार असतो त्याठीकाणी श्री सदस्य धरी जाताना रस्ता कॅाक्रीटी करण असेल रस्त्याने स्ट्रीट लाईट असेल हि महत्वाची कामे करणे गरजेचे आहे असे मत बापुसाहेब भेगडे यांनी मांडले त्यावर मा.मंत्री बाळाभाऊ भेगडे म्हणाले की आपण लवकरच उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांची भेट घेऊन विकास कामासंदर्भात विशेष निधी उपलब्ध करूयात.

यावेळी प्रामुख्यने मावळचे सभापती गुलाबराव म्हाळसकर पुणे जिल्हा रा.यु.कॅाग्रेसचे अध्यक्ष.सचिन घोटकुले संत तु.स.सा.का.संचालक.सुभाष जाधव मावळ तालुका कार्याध्यक्ष.सुनिल दाभाडे, कैलास गायकवाड, बाबुलाल गराडे बेबेडोहळ ग्रा.पं.सरपंच.राकेश घारे सोमाटणे ग्रा.पं.मा.सरपंच्.नवनाथ मुर्हे, अविनाश गराडे, शैलेश मुर्हे, पप्पु चांदेकर,बंडु घोजगे,अनंता आन्द्रे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!