Puneमहाराष्ट्रराजकीय

अ‍ॅड. तोसिफ चांद शेख & असोसिएट लीगल फर्मचे भीम आर्मी चे संस्थापक अध्यक्ष तथा आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. भाई चंद्रशेखर आजाद यांच्या हस्ते उद्घाटन.

या प्रसंगी संविधान उद्देशिकेच्या भव्य प्रतिमेचे कार्यालयात अनावरण...

Spread the love

अ‍ॅड. तोसिफ चांद शेख & असोसिएट लीगल फर्मचे भीम आर्मी चे संस्थापक अध्यक्ष तथा आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. भाई चंद्रशेखर आजाद यांच्या हस्ते उद्घाटन या प्रसंगी संविधान उद्देशिकेच्या भव्य प्रतिमेचे कार्यालयात अनावरण…

आवाज न्यूज : प्रतिनिधी, ४ जानेवारी

अ‍ॅड. तोसिफ चांद शेख & असोसिएट लीगल फर्मचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला, अ‍ॅड. भाई चंद्रशेखर आझाद यांचे हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले तर कार्यालयातील सभागृहात संविधान प्रास्ताविकेच्या भव्य प्रतिमेचे अनावरण अ‍ॅड. भाई चंद्रशेखर व माजी पोलीस महासंचालक, मा. एस.एम.मुश्रीफ साहेब यांचे हस्ते करण्यात आले.

पुणे : 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या अ‍ॅड. तोसिफ चांद शेख & असोसिएट या लीगल फर्मचे कार्यालय उद्घाटन सोहळ्यास भाई चंद्रशेखर आझाद उपस्थित होते. या प्रसंगी कार्यालयाच्या सभागृहात संविधान उद्देशिकेचे भव्य प्रतिमेचे अनावरण अ‍ॅड. भाई चंद्रशेखर आझाद व माजी पोलीस महासंचालक मा. एस . एम. मुश्रीफ साहेब यांचे शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी अ‍ॅड.भाई चंद्रशेखर आझाद यांनी वेगवेगळ्या विषयावर आपले मत मांडले,विद्यमान परिस्थतीत बद्दल चिंता व्यक्त करताना म्हणाले कि,केवळ दुसऱ्याला वाईट ठरवून आपण चांगले ठरू शकणार नाही. भाई चंद्रशेखर आझाद यांनी सध्या देशाला ग्रासलेल्या समस्यांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले, तरुणांना पुन्हा आत्मविश्वास मिळवून आव्हानांवर मात करण्याचे आवाहन केले. अदम्य इच्छाशक्ती आणि आत्मशक्तीची क्षमता अधोरेखित करण्यासाठी ऐतिहासिक समांतरे रेखाटून, जागतिक स्तरावर सर्वाधिक तरुण लोकसंख्या असूनही भारताच्या कमकुवतपणावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुर्दम्य इच्छाशक्ती व पराकोटीचे आत्मबल या जोरावर फक्त ५०० शुरवीर योद्धे ३० हजार सेन्यावर भारी पडले. दुर्देवाने आजचा युवा आत्मबल हरवून बसला आहे.अशा परिस्थितीत तो जिंकणार कसा अशी खंत व्यक्त केली.

आपल्या भाषणात अ‍ॅड. भाई चंद्रशेखर आझाद म्हणाले कि, दिवसेंदिवस जुडीशरीचा दर्जा खालावत चालला आहे, न्यायदानाला होत असलेल्या विलंबामुळे बहुसंख्य लोक न्यायापासून वंचित राहत आहेत.अशावेळी अधिक गतिमान आणि कार्यक्षम न्यायिक प्रक्रियेसाठी वकिलांनी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संविधान उद्देशिकेच्या प्रतिमा अनावरण कल्पनेची अनिवार्यता स्पष्ट करीत .ते पुढे म्हणाले कि,संविधानाच्या प्रास्ताविकेच्या भव्य प्रतिमेचे अनावरण हा एक स्तुत्य उपक्रम आहे, जो आपल्या संविधानात अंतर्भूत तत्त्वे आणि मूल्यांशी बांधिलकीचे प्रतीक आहे. आपल्या समाजातील न्याय, समानता आणि कायद्याचे राज्य याच्या महत्त्वाची सखोल जाणीव ते प्रतिबिंबित करते.शेवटी अ‍ॅड. तौसिफ़ चाँद शेख & असोसिएट्स लीगल फर्मला पुढील यशस्वी आणि प्रभावी प्रवासासाठी शुभेच्छा देऊन तुमचे प्रयत्न कायदेशीर क्षेत्रासाठी आणि शेवटी समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील.असा आशावाद भाई अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रसंगी बोलताना कायक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. एस . एम. मुश्रीफ यांनी संविधान उद्देशिकेच्या प्रतिमा अनावरण कल्पने बाबत अ‍ॅड. तौसिफ़ शेख व त्यांचा सहकाऱ्यांचे कौतुक केले.तसेच भीमा कोरेगांव विजय दिनाचे महत्व आपल्या ओघवत्या शैलीत विशद केले.त्यांनी वकिलांचे समर्पण आणि न्याय मिळवण्यासाठी केलेल्या वचनबद्धतेचे कौतुक केले.आपल्या शैलीत मा. एस.एम. मुश्रीफ यांनी भीमा कोरेगाव विजय दिनाचे महत्त्व अधोरेखित केले . ऐतिहासिक संदर्भ आणि त्याचे महत्त्व सखोल समजावून, त्यांनी हा दिवस शौर्याचे प्रतीक आणि अन्यायाविरुद्ध सतत लढा म्हणून ठळकपणे मांडला. न्याय्य भविष्यासाठी प्रयत्नशील असताना भूतकाळातील संघर्ष लक्षात ठेवण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची आवश्यकता यावर त्यांनी जोर दिला.

अ‍ॅड. तौसिफ़ शेख यांचे सहकारी अ‍ॅड. क्रांती सहाने (महासचिव महाराष्ट्र राज्य आजाद समाज पार्टी ) यांनी आपल्या भाषणादरम्यान लोकशाहीच्या चौकटीला आकार देण्यासाठी संविधानाची महत्त्वपूर्ण भूमिका मान्य केली. लोकशाहीसमोरील सध्याच्या आव्हानांवर त्यांनी आपले मत मांडले आणि त्यांना तोंड देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे यावर भर दिला.लीगल फर्मचे माध्यमाने शोषितांना,वंचितांना न्याय देणेसाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.तसेच संविधान उद्देशिकेच्या कल्पनेबाबत बोलताना अ‍ॅड क्रांती सहाने म्हणाले कि,अग्रसेन टाईम्स व विक्रांद टाईम्सचे मुख्य संपादक अरुणकुमार मुंदडा यांनी उभारलेल्या संविधान संवर्धन या उपक्रमातून प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले.

आभार प्रदर्शन व्यक्त करताना अ‍ॅड तौसिफ़ शेख यांनी अ‍ॅड तौसिफ़ शेख & असोसिएट्स या लीगल फर्मचा न्यायपालिकेची स्थिती, लोकशाहीसमोरील आव्हाने आणि घटनात्मक मूल्यांचे पालन करण्यासाठी कायदेशीर भूमिका यावर अर्थपूर्ण चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ बनविण्याचा निर्धार केला.

या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा .एस.एम. मुश्रीफ साहेब (महाराष्ट्राचे माजी महा संचालक) मा. अरुण करांडे साहेब (निवृत्त मुख्य अधिकारी,म्हाडा ) मा. प्रशांत जगताप साहेब ( मा.महापौर,पुणे ) मा. ॲड हाजी गफुर पठाण साहेब (मा. नगरसेवक, पुणे, महानगरपालिका ) मा. फारुक इनामदार (मा. नगरसेवक, पुणे, महानगरपालिका ) मा.सुनील हांडे साहेब (पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे ज्येष्ठ सरकारी वकील) अ‍ॅड विवेक बरगुडे साहेब (पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ) आनंद दादा लोंढे साहेब (आजाद समाज पार्टी ) श्री. अजमुतुल्ला खान (संपादक,दैनिक जनमंथन) आय . टी शेख, साबीर सय्यद, हें मान्यवर आवर्जून उपस्थित होते.या कार्यक्रमास शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, प्रशासकीय अधिकारी , तसेच विधिज्ञ, पत्रकार असे सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार तसेच पुरोगामी प्रकाशन चे सर्वेसर्वा मा. चांद भाई शेख साहेब यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!