आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद..

आता लागू होणार चार वर्षांचा विशेष अभ्यासक्रम

Spread the love

बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद ; आता लागू होणार चार वर्षांचा विशेष अभ्यासक्रम.BEd course closed permanently; Four years special course to be implemented now.

आवाज न्यूज : नवी दिल्ली, ८ जानेवारी.

बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र 2024-2025 पासून केवळ चार वर्षांच्या विशेष बी.एड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाणार आहे. रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (RCI) ने यासंदर्भात नोटीस जारी केली आहे.

देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष बीएड अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. या अभ्यासक्रमांना आरसीआयकडून मान्यता देण्यात येते. आरसीआयने आपल्या परिपत्रकामध्ये संपूर्ण देशातील सुमारे 1000 संस्था आणि विद्यापीठे यांच्यासाठी हा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे असे स्पष्ट केलेय.

रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाचे (RCI) सचिव विकास त्रिवेदी यांनी हे परिपत्रकात जारी केले आहे. या परिपत्रकात NCTE ने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP) मध्ये चार वर्षांच्या B.Ed कार्यक्रमाची तरतूद केली आहे.

काय आहे विशेष बीएड अभ्यासक्रम?
विशेष बीएड अभ्यासक्रमामध्ये शिक्षकांना दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते. दिव्यांग मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये श्रवण, वाक्, दृष्टिदोष, मानसिक अपंगत्व इत्यादी अपंगांसाठी अभ्यासक्रम चालविला जातो. ज्या संस्थांना चार वर्षांचा एकात्मिक बीएड विशेष शिक्षण अभ्यासक्रम (एनसीटीईच्या चार वर्षांचा आयटीईपी अभ्यासक्रमासारखा) ऑफर करायचा असेल त्या पुढील शैक्षणिक सत्रासाठी अर्ज करू शकतील असे आरसीआयने म्हटले आहे.

एनसीटीई विशेष बीएड एकात्मिक अभ्यासक्रमासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरसीआय हा अभ्यासक्रम राबवणार आहे. एनसीटीईचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार तयार केला जात आहे. या संदर्भात डॉ. शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वसन विद्यापीठ, लखनौचे प्रवक्ते डॉ. यशवंत वीरोदय यांनी बीएड (विशेष शिक्षण) या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या भवितव्याबाबतच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!