ताज्या घडामोडी

दिवाळी सुट्टीत चित्रकलेची कार्यशाळा….विद्यार्थ्यांचा प्रतिसाद..!

Spread the love

मंथन आर्ट स्कूल रत्नागिरीच्या माध्यमातून एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या दिवाळी सुट्टीतील कार्यशाळेत चित्रकलेची अनेक गुपिते मुलांना उलगडून दाखवण्यात आली.
सुप्रसिद्ध चित्रकार,वल्ड रेकाॅर्ड फेम,अनेक पुरस्कारांनी सन्मानित आर्टिस्ट अर्जुन माचिवले यांनी पेन्सिल शेडिंग व वाॅटरकलर प्रात्यक्षिकासह सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ड्राईंग,फिगर स्केच,हेड स्टडी आणि लँडस्केप चे प्रात्यक्षिकाचे निरीक्षण करुन विद्यार्थ्यांनी हुबेहुब काढण्याचा प्रयत्न केला.
या कार्यशाळेत चित्र काढता येणारे आणि चित्रकलेची आवड असणारे सर्वच कलाकार सहभागी झाले होते.
चित्रकलेबाबत सखोल मार्गदर्शन, प्रश्न-उत्तरांची चर्चा आणि लाईव्ह डेमोस्ट्रेशनच्या किमयेने सहभागी विद्यार्थी अधिक तरबेज झाले.
मंथन आर्ट स्कूल आज ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहचावे म्हणून सातत्याने प्रयत्न करते आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या कलाक्षेत्रात करिअर करावे आणि कलाक्षेत्र अधिक दर्जेदार बनवावे यामागचा मुख्य उद्देश आहे.
कला क्षेत्रात अनेक प्रकारचे व्यवसाय व नोकरीची संधी उपलब्ध असून बर्‍याच विद्यार्थ्यांना आवड असूनही या विषयात करिअर करता येत नाही.तसेच मुंबई,पुणे येथे जाऊन शिक्षण घेणे सर्वांनाच सहजशक्य नाही.अशा मुलांसाठी अल्प कालावधीचे उपयुक्त,आँनलाईन कोर्स हि मंथनने उपलब्ध करुन दिले आहेत.
या कार्यक्रमातून माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद करता आला. शैक्षणिक अभ्यासक्रम शिकत असताना क्रिएटीव्ह आर्टचे शिक्षण घेता येऊ शकते. सर्व सहभागी कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आहे. या कार्यक्रमाला फाटक हायस्कूलचे कलाशिक्षक निलेश पावसकर, सेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार यादव,मुंबईहून कलाशिक्षक रिंकू सरदार,प्रा.प्रतिक्षा पांचाळ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन हे मंथन आर्ट स्कूल,रत्नागिरीने केले होते. मंथनचे डायरेक्टर प्रा.शशिकांत गवळी यांनी उपक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सर्व कार्यक्रमाचे सुत्र शाखाधिकारी प्रा.संदेश पालये यांनी हाती घेतले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!