आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीय

डिजिटल मीडिया, आपण ‘लांडगा आला रे आला’, असं तर नाही ना करत ?

अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न मावळ डिजिटल मीडिया पत्रकार संघ च्या उदघाटन समारंभाच्या वेळी घडलेला प्रसंग, पण खरंच थोडा विचार करायला लावणारा..

Spread the love

डिजिटल मीडिया, आपण ‘लांडगा आला रे आला’, असं तर करत नाही ना  ?

आवाज न्यूज :  मावळ विशेष लेख, १३ जानेवारी.

 

हा काल परवाचा विषय आहे. अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न मावळ डिजिटल मीडिया पत्रकार संघ च्या उदघाटन समारंभाच्या वेळी घडलेला प्रसंग, पण खरंच थोडा विचार करायला लावणारा वाटला म्हणून ही लिखाण सेवा.
कामशेतचे मा.पोलीस इन्स्पेक्टर संजय जगताप साहेब या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांनी अतिशय महत्त्वाचा विषय मांडला, ते बोलले की ज्या प्रमाणे वृत्तपत्रानी आपली विश्वासार्हता मिळवलेली किंवा आहे तेवढीच विश्वासार्हता डिजिटल मीडिया ने मिळवणे खूप गरजेचे आहे.

खूप महत्वाचा मुद्दा याठिकाणी मा जगताप साहेबांनी मांडला होता.खरोखर विचार करायला लावणारा वाटला.मग असे काय होते ज्यामुळे असे बोलणे गरजेचे वाटले.
जे प्रामाणिक काम करतात त्यांना मात्र दंडवत.
खुपदा असे होते,की खूपच आकर्षक असे शीर्षक द्यायचे परंतु जेव्हा आत मध्ये पाहिले जाते तेव्हा मात्र अगदी किरकोळ बातमी किंवा माहिती असते की जी अतिशय सामान्य आणि निरुपयोगी असते.यामुळे असे वाटते की डिजिटल मीडिया मध्ये काम करणारे डिजिटल पत्रकार वाचकांच्या, प्रेक्षकांच्या भावनांचा विचार करत नाही,याउलट ते भावनांशी खेळतात.बऱ्याच बातम्या अशा असतात, की ‘अमुक अमुक महानगरपालिकेत 50 हजार 40 हजार कामगार भरती ,अर्ज करा ,नोकरी मिळावा, फक्त मुलाखत आणि थेट भरती,वैगरे वैगरे.

अक्षरशः वाचक फेक न्यूज म्हणून फेकून देतात आणि दोन ठेवणीतल्या शिव्या देऊन मोकळे होतात. काही काही ठिकाणी तर अमुक अमुक कलाकार यांचा अपघात,डॉक्टरांनी सांगितले आहे हे ….आणि मग वाचा.आणि जेव्हा लिंक ओपन केली जाते तेव्हा मात्र ते कलाकार थोडे कुठे तरी पडलेले असतात आणि त्यांना थोडी दुखापत झालेली असते.एवढेच नाही तर मागे एकदा एका मोठ्या कलाकाराच्या तर मृत्यूच्या बातम्याच दिल्या होत्या आणि त्यावेळी ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते,अशा बातम्यांमुळे वाचकांच्या भावना दुखावल्या जातील किंवा त्यांना राग येईल याचा थोडा देखील विचार डिजिटल पत्रकार करत नाही,हे मात्र विशेष.आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी देतो त्यावेळी त्याच्या नातेवाईकांना किंवा त्या व्यक्तीला काय वाटेल याचा थोडा देखील विचार करत नाही किती दुर्दैव.

हे फक्त न्यूज पोर्टल बद्दल होते असे नाही,तर you tube चॅनेल वाले ही करतात ,जे खरोखर प्रामाणिक पणे करतात त्यांना मात्र दंडवत.शीर्षक आकर्षक असावे हें अतिशय महत्त्वाचे असते परंतु त्या शीर्षकाखाली जो व्हिडिओ असतो तो सुध्दा त्याला साजेसा असावा ,हे मात्र तितकेच महत्त्वाचे असते.

शेवटी काय हो वाचक हा वाचकच असतो भले तो वृत्तपत्र वाचणारा असो किंवा मोबाईल वर पोर्टल वाचणारा, टेलिव्हिजनवर बातम्या पाहणारा असो मोबाईलवर.
शेवटी वाचक हा जाणकार असतो,त्याला सगळे कळते,जसे वाचक ,प्रेक्षक तुम्हाला मिलियन views देऊ शकतात, चांगल्या कंमेंट्स देऊन दाद ही देऊ शकतात तसेच वाईट असेल तर दोन शिव्या देऊन आपला राग ही व्यक्त करू शकतात त्यामुळे आपला “लांडगा आला रे आला” होणार नाही याची काळजी डिजिटल मीडिया मध्ये काम करणाऱ्यां सर्व डिजिटल पत्रकरांनी घेतलीच पाहिजे एवढीच इच्छा!

लेखन:प्रफुल्ल ओव्हाळ.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!