ताज्या घडामोडी

न्यु इंग्लिश स्कुल सैतवडे ता.जि.रत्नागिरी येथील विद्यमान मुख्याध्यापक श्री अनिल कांबळे यांचे निधन

Spread the love

न्यू इंग्लिश स्कुल ,सैतवडेचे विद्यमान  मुख्याध्यापक श्री अनिल शिवाप्पा कांबळे (वय ५५) यांचे आज सकाळी निधन झाले. गेले तीन महिने त्यांच्यावर किडणीच्या आजारावर उपचार सुरू होते.अत्यंत अभ्यासू, मनमिळाऊ ,शांत स्वभाव असलेल्या कांबळे सरांची आजाराशी झुंज कमी पडली व आज त्यांची प्राणज्योत मालवली.विद्यार्थी प्रिय सर म्हणून ते विद्यार्थ्यांत प्रिय होते.मुख्याध्यापक असुनही आठवड्यातून चाळीस तास अध्यापन करत असत.नवीन शिक्षक भरती नसल्याने हा प्रचंड भार ते विनातक्रार सहन करत होते.त्यांनी आपल्या कारकिर्दीत शाळेचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला.लाखो रूपयांची पदरमोड करुन शाळेत अनेक भौतिक सुविधा केल्या.
त्यांच्या अचानक मृत्यूने खंडाळा व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी तालुका मुख्याध्यापक संघाच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!