आरोग्य व शिक्षण

पवना शिक्षण संकुलात शरदचंद्रजी पवार पुस्तक पेढी सुरू

Spread the love

पवनानगर : येथील पवना शिक्षण संकुलात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुस्तक पेढी सुरू करण्यात आली आहे.

पवन शिक्षण संकुलातील सर्व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने मावळ युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे यांनी दोन हजार पुस्तके या पेढीसाठी दिली आहेत.

यावेळी नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळाचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, नवीन समर्थ विद्यालय शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा, प्राचार्य अंजली दौंडे, पर्यवेक्षका निला केसकर, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष काशिनाथ निंबळे, शालेय समिती सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, काले सरपंच खंडू कालेकर,उपसरपंच अमित कुंभार, महागाव सरपंच सोपान सावंत, शाहीदास निंबळे, माजी उपसरपंच संजय मोहोळ, परांजपे विद्यालय मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, एकवीरा विद्यालय मुख्याध्यापक भगवान शिंदे, नंदकुमार धनवे यांच्यासह पवना शिक्षण संकुलातील सर्व अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!